Home विदर्भ तळेगावात ट्रकचा भिषण अपघात – दोघे गंभीर जखमी

तळेगावात ट्रकचा भिषण अपघात – दोघे गंभीर जखमी

87

इकबाल शेख – वर्धा

तळेगांव (शा.पं.):- अमरावती- नागपुर राष्ट्रिय महामार्गावरील तळेगाव नजीकच्या उदयराज सभागृह जवळ मंगळवारचे पहाटे साडे पाच वाजेदरम्यान कंटेनरवर मागावुन भरघाव ट्रक धडकुन भीषण अपघात झाला. त्यात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार,नगरवरुन बंगालकडे संत्रा घेवुन भरघाव जात असलेला ट्रक क्र.डब्लु. बी. २५ के.९३३६ अोव्हरटेक करण्याच्या नादात अमरावती कडुन नागपुरकडे जाणार्‍या कन्टेनर क्र.एन.एल. ०१ एल ७६२८ ला मागावुन जोरदार धडकला यामध्ये ट्रक चालक मोहमद कमाल मोहमद सदऊद्दिन वय ३८ हा ट्रकच्या कॅबिनमध्ये दबुन गंभिर जखमी झाला तर त्याचा सहकारी मोहमद सनाऊल्ला मोहमद बदऊद्दिन वय ४२ दोघेही रा. कुबडा जि. सहसा, बिहार हे गंभीर जखमी झाले. तळेगाव पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी जमादार गजानन बावने, राजु शाहु, बालाजी मस्के, विजय उईके, चालक देवेंद्र गुजर घटनास्थळी दाखल झाले. कॅबीन मध्ये दबल्या गेलेला चालकास मोठ्या शिताफीने बाहेर काढुन त्याला व त्याच्या सहकार्‍याला ग्रामीन रुग्णालय आर्वी येथे रवाना केले. यामध्ये ट्रक व कन्टेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस निरिक्षक आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनात तळेगाव पोलीस करीत आहे.