Home विदर्भ घाटंजी तालुका लगतच्या सावळी सदोबा येथील आरोग्य शिबिरात आठशेच्यावर रुग्णांनी लाभ घेतला..!

घाटंजी तालुका लगतच्या सावळी सदोबा येथील आरोग्य शिबिरात आठशेच्यावर रुग्णांनी लाभ घेतला..!

192

➡️ यवतमाळच्या नामवंत व तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती..?

( अयनुद्दीन सोलंकी ),

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यालगत असलेल्या सावळी सदोबा येथे दि. 16 जानेवारी रोजी शहीद ज्ञानेश्वर आडे बहुउद्देशीय संस्था, कृष्णनगर यांच्या वतीने भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सावळी सदोबा व परिसरातील गावातील आठशेच्यावर रुग्णांनी विविध आजाराची तपासणी करून उपचार करून घेतले.
यवतमाळच्या नामवंत व तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी केली. आयोजकांकडून रुग्णांच्या तपासणी सोबतच मोफत औषधोपचाराचीही व्यवस्था करण्यात आली होती, हे विशेष.
सावळी सदोबा येथील तंवर कॉंम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात यवतमाळच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ‌ डॉ. सौ. योगिता झोपाटे, मानसिक रोग व व्यसनमुक्ती तज्ञ‌ डॉ. विनोद जाधव, बालरोग व नवजात शिशू तज्ञ‌ डॉ. विशाल चव्हाण, जनरल सर्जन डॉ. विशाल येलके व त्वचारोग तज्ञ ‌ डॉ. दिनेश चव्हाण आदींनी आलेल्या रुग्णांची तपासणी करून उपचार केले.
या रोगनिदान शिबिरात आलेल्या आठशेपेक्षा जास्त रूग्णांची तपासणी व औषधोपचार संपूर्णपणे मोफत करण्यात आले.
आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांची रक्त तपासणीही मोफत करण्यात आली. शिबिरात मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग या कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली होती. या शिबिरात तपासणी करून औषधोपचार घेतलेल्या रुग्णांनी या शिबिराचे आयोजक वीरपत्नी कुंतीताई ज्ञानेश्वर आडे, नुनेश्वर आडे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांचे आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ईन्दंल महाराज चव्हाण, यश गुल्हाणे, किसन नाईक चव्हाण, जितेश पवार, ईंद्रसिंग चव्हाण, विजय राठोड, सनम तंवर, उमाकांत आडे, समीर तंवर , राज चव्हाण, अमोल जाधव , विरू राठोड, चेतन चव्हाण, विक्रम राठोड, अक्षद राठोड, टिनु चव्हाण, संतोष पवार, अमित जाधव, ऊल्हास जाधव, डोमा चव्हाण, हरिश जाधव, जिवन चव्हाण, चेतन राठोड, सुदिप राठोड, वैभव राठोड, शुभम आडे, सनी आडे, सत्पुरुष चव्हाण, मनमोहन जाधव, आकाश जाधव, पिंटू चव्हाण, धिरज चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, कोमल राठोड, सुरज आडे आदींनी अथक परिश्रम घेतले.