Home विदर्भ Yavatmal जिल्ह्यातील समस्येकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष…! 

Yavatmal जिल्ह्यातील समस्येकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष…! 

431
भुमरे यांनी पालकत्व सोडावे गुरुदेव युवा संघाची मागणीसमस्याचे निवेदने डब्यात”
प्रतिनिधी/यवतमाळ  – शहरातील विविध समस्याबाबत पालकमंत्री ना.संदिपान भुमरे यांना गुरुदेव युवा संघाच्या वतीने शहरातील विविध समस्याबाबत पाच ते सहा वेळा निवेदने दिलीत. परंतु प्रशासकीय स्तरावर या निवेदनातील कोणतीच मागणी बाबत विचार सुध्दा करण्यात आला नाही. त्यामुळे पालकमंत्री हे नागरीकांना समस्याकडे लक्ष देण्याकरीता आहे की, दुर्लक्ष करण्या करीता असा सवाल गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकत्व पालकमंत्री भुमरे यांनी सोडावे  या मागणीचे निवेदन लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट मंत्रालयात गुरुदेव युवा संघाच्या वतीने देण्यात येणार आहे व येत्या 26 जानेवारीला पालकमंत्र्यांना गुरुदेव युवा संघाच्या वतीने घेराव सुद्धा घालण्यात येणार आहे असा इशारा यावेळी अध्यक्ष मनोज गेडाम यांनी दिला आहे
शहरातील पिंपळगाव येथील सिलेंडर स्फोट पीडित दीड वर्षे उलटूनही त्यांना कुठलाच न्याय मिळाला नाही व कुठलीच शासनाकडून मदत मिळाली नाही. आज पर्यंत लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या सुटेल म्हणून 584 जणांच्या तक्रारी झाल्या परंतु जिल्हाधिकारी यांनी यातील कोणतीच तक्रार निकाली काढली नाही.
दिव्यांग यांना शासनाकडून पाच टक्के निधी येतो परंतु दिव्यांगाच्या योजनेवर खर्च केल्या जात नाही. वारंवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊनही कुठलीच कारवाई करीत नाही. यवतमाळ शहरामध्ये एकाही गोरगरीब झोपडपट्टी वाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाले नाही. 2016 पासून 3556 लाभार्थी वंचित आहे. ज्यांना खरी घराची गरज आहे. त्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नाही. आणि ज्यांच्या स्वत:चे घर आहे अश्‍या लोकांना आवास योजना लाभ मिळतो. गेल्या पन्नास वर्षापासून आदिवासी कोलाम पोळ वाघापूर अनेक मूलभूत सुविधा पासून वंचित आहे, विटाभट्टी परिसर चाळीस वर्षापासून नागरिक हक्काचे पट्टी नसल्यामुळे अनेक मूलभूत सुविधा पासून वंचित आहे. पिंपळगाव बायपास तीन कुटुंब दोन वर्षे उलटूनही पर्याय जागेपासून वंचित आहे. यवतमाळ तहसील मध्ये निराधार व दिव्यांगांना तुटपुंजे मानधन वेळ मिळत नाही कधी पाच महिन्यांनी मिळते कधी ते चार महिन्यांनी मिळते त्यामुळे दिव्यांगाचे निराधारांचे महिन्याच्या महिने मानधन मिळण्यात यावे.  यवतमाळ शहरामध्ये महिलांसाठी शौचालय व मुत्रीघर ची निर्मीती करण्यात यावे. कामगार मजूर अनेक योजनेपासून वंचित आहे 2018 पासून कामगारांच्या मुलाला स्कॉलरशिप चा मानधन मिळाला नाही. यवतमाळ शहरामध्ये फुटपाथ वर उभी बेसहारा नागरिकांना पर्यायी जागा देण्यात यावे. 26 जानेवारी जवळ आली आहे. शहरातील महामानवाचे पुतळे दयनिय अवस्थेत आहे. तसेच आझाद मैदानातील विजय जयस्तभ दैयनिय अवस्थेत आहे. यवतमाळ शहरातील नगर परिषद शाळेमध्ये गोरगरिबांच्या मुलांना मूलभूत सुविधा देण्यात यावा. यवतमाळ शहरामध्ये जीवन प्रकाश योजना राबविण्यात यावे. विट्टाभट्टी परिसरातील रहिवाश्‍यांना त्यांच्या हक्काचे पट्टे मिळण्याकरीता त्या जागेवरील आरक्षण त्वरीत हटविण्यात यावे. यासह अन्य विविध मागण्या पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना करण्यात आल्या हाेत्या परंतु या मागण्यांना पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी या मागण्या केराच्या डब्ब्यात टाकल्याचे दिसून येत असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, मंदा मानकर, दत्ता बावणे, संध्या पराते, लता कावरे, सविता ठाकरे, प्रफुल मानकर, किशोर नरांजे इत्यादी केला आहे.