Home विदर्भ सावळी (सदोबा) येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर…!

सावळी (सदोबा) येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर…!

192

🔵➡️ सावळी (सदोबा) तथा परिसरातील रुग्नांणा लाभ घेण्याचे आवाहन..?

(अयनुद्दीन सोलंकी)

घाटंजी / यवतमाळ – सावळी सदोबा येथे शहीद ज्ञानेश्वर आडे बहुद्देशीय संस्था कृष्णनगर यांच्या वतीने 16 जानेवारी रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता “तंवर कॉम्प्लेक्स सावळी सदोबा” येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सावळी सदोबा व परिसरातील गोरगरीब रुग्णांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन शिबिराचे आयोजक आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नुनेश्वर आडे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
सावळी सदोबा येथील आरोग्य तपासणीत यवतमाळ येथील सुप्रसिद्ध व नामवंत डॉक्टर या शिबिराला उपस्थित राहणार आहे. बालरोग तज्ञ डॉ.आशिष पाटील व नवजात शिशू तज्ञ डॉ. विशाल चव्हाण, स्त्री रोग तज्ञ डॉ. योगिता झोपाटे, जनरल सर्जन डॉ. विशाल येलके, मानसिक रोग व व्यसनमुक्ती तज्ञ डॉ. विनोद जाधव, त्वचारोग तज्ञ डॉ. दिनेश चव्हाण आदीं डॉक्टर शिबिरात येणाऱ्या सर्व रुग्णांची मोफत तपासणी करून मोफतच औषधोपचार करतील, असे पत्रकार परिषदेत आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नुनेश्वर आडे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी सांगितले.
तेव्हा सावळी सदोबा व परिसरातील सर्व रुग्णांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेतून सावळी व परिसरातील जनतेला केले आहे.
यवतमाळ सारख्या शहराच्या ठिकाणी जाऊन उपचार करणे गोरगरीब रुग्णांना परवडणारे नाही, त्यामुळे त्यांच्या हिताच्या व सोयीच्या दृष्टीने आम्ही सावळी सदोबा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही नुनेश्वर आडे आणि मुबारक तंवर यांनी यावेळी सांगितले.
शासनाच्या नवीन कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन शिबिरात येणाऱ्या सर्वांनी करावे, तंवर कॉम्प्लेक्स मध्ये शिबिराच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व रुग्णांना मोफत मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा शिबिरात येणाऱ्या सर्व रूग्णांनी कोरोना नियमांचे पालन करावे तसेच सावळी सदोबा येथिल आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नुनेश्वर आडे व मुबारक तंवर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला किसन नाईक चव्हाण, ईंदल महाराज, ईंदरसिंग चव्हाण, उमाकांत आडे, विजय राठोड, रवि राठोड, वैभव राठोड, राज चव्हाण, अमित जाधव, मिथुन राठोड आदीं उपस्थित होते.