Home विदर्भ कोरोनापेक्षा हि भयंकर महामारी म्हणजे दारूची समाजाला लागलेली कीड…..

कोरोनापेक्षा हि भयंकर महामारी म्हणजे दारूची समाजाला लागलेली कीड…..

305

यवतमाळ –  स्थानिक बाबुळगाव तालुक्यात असलेल्या पिंपरी ईजारा इंदिरानगर या गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असताना, दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने, दारूबंदीची महिला समिती गठित करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण गावात दारूबंदी यशस्वी पद्धतीने राबविल्यानंतर आज दारूबंदी कशासाठी असायला हवी या विषयाला घेऊन प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना बाबुळगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र जेथे म्हणाले, आज गावात असलेली कोणत्याही प्रकारची दारू निदर्शनास आली तर गावकऱ्यांनी आम्हाला कल्पना दिल्यास आम्ही त्या दारूचा नायनाट करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व फलकाचे अनावरण करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक, उमेश मेश्राम आपले विचार मांडत असताना म्हणाले, मागील दोन ते अडीच वर्षाच्या कालखंडात विदेशातून आलेला कोरोनाविषाणू आमच्या जीवनशैलीत थैमान माजवत असताना संपूर्ण समाज व्यवस्था वैतागून गेली आहे. हे जरी सत्य असले तरी मागील शतको वर्षांपासून समाजाला दारूची लागलेली कीड कोणतेही शासन कर्ते पक्ष पुसण्याचा प्रयत्न सुद्धा करताना दिसून येत नाही. या महाभयंकर राक्षस रुपी दारूच्या व्यसनाने दीनदुबळ्या दलित आदिवासी, मागासवर्गीय यांचे परिवार उद्ध्वस्त होत आहेत. हे आम्ही उघड्या डोळ्याने बघून केवळ सामान्य माणसाचा केवळ मतासाठी वापर करून घेणे एवढाच कायदा या देशात अस्तित्वात आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना महामारी नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन आपला लढा तीव्र करणार आहे. या कार्यक्रमात प्रामुख्याने भिम टायगर सेना कामगार विदर्भ अध्यक्ष विनोद शेंडे, युवा जिल्हाध्यक्ष विजय धुळे, रितेश मुन, अक्षय खोब्रागडे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून, गावचे तंटामुक्त अध्यक्ष पुंडलिक आरेकर, पोलीस पाटील दिलीप पाटील, उत्तम मानकर, वासुदेव दाभेकर, शेषराव मोकाशे महाराज, भूपेंद्र नासरे, देवा टेकाम, दारूबंदी समितीच्या अध्यक्षा पंचफुला मादापुरे, इंदिराबाई येरणे, वंदना चिरकार, उज्वला बेंडे, सुभाष मोकासे, सुशील मेश्राम.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुळगाव तालुका दारूबंदीचे समन्वयक विजय ढोबरे व या कार्यक्रमाचे उत्तम संचालन संदीप बेंडे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन उज्वला भेंडे यांनी केले…..