Home मराठवाडा ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने अंगणवाडीना साहित्य वाटप

ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने अंगणवाडीना साहित्य वाटप

205
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच पंढरीनाथ खटके यांच्या संकल्पनेतून वडीगोद्री ग्रामपंचायतच्या वतीने गावातील अंगणवाडी क्र.१,२,३,४,५ व ६ यांना कपाट,गॅस शेगडी,खुर्च्या असे विविध प्रकारचे अंगणवाडी साहित्य वाटप करण्यात आले.

तसेच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एडजेस्टेबल कॉट देण्यात आला.तसेच गावातील नाली सफाई करणाऱ्या कामगार महिला यांना साडी वाटप करण्यात आल्या.

यावेळी आदर्श ग्राम पंचायत सरपंच पंढरीनाथ खटके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजेश टोपे यांच्या दीर्घायुष्याबद्दल वाढदिवसाच्या आरोग्यम्य शुभेच्छा दिल्या.लहान मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी व संस्कारासाठी अंगणवाडी एक मुख्य पाया आहे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे हे आपले काम आहे असे विशद केले.तसेच डिलिव्हरी बायांची डिलिव्हरी काळात होणार तारांबळ लक्षात घेऊन आपण एडजेस्टेबल कॉटची व्यवस्था केल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी पंचायत समिती सभापती बापूराव खटके,उपसरपंच आण्णासाहेब काळे,उद्योजक रामेश्वर गावडे,ग्रा.पं.सदस्य नारायण वायाळ,माजी सरपंच दीपक पवार,राष्ट्रवादी वक्ता सेल जिल्हाध्यक्ष ऍड सचिन पवार,ग्रा.पं.सदस्य उमेश काळे,श्रीमती पारुबाई खैरे,रोहिदास पवार,बाबासाहेब गावडे,अभिषेक पवार,अभिजित खटके,विजय शिंदे,ग्रामसेवक एम.एन.गांडगे,पंडित गावडे,सुभाष भोईटे,आर.व्ही.छल्लारे,नरेंद्र गाढवे,विजय खटके,राजेंद्र पवार,डी.एन. शिकारे,अनिल खंडागळे,विकास पवार,विष्णुदास खटके,संजय डहाळे,भानुदास नरवडे,दास गांगुर्डे,रविंद्र भारती,कीर्ती गांगुर्डे,हारी अशोक गावडे,बाबासाहेब आटोळे,बाबू राठोड अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.