Home विदर्भ विधी अभ्यासकांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘लिगल कॉसमॉस’ चे थाटात प्रकाशन

विधी अभ्यासकांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘लिगल कॉसमॉस’ चे थाटात प्रकाशन

354

माजी खासदार विजय दर्डा यांनी केले प्रकाशन

यवतमाळ , दि. ०८ :- स्थानिक विद्या प्रसारक मंडळ द्वारा संचालित अमोलकचंद विधी महाविद्यालयाने नुकतेच दि. ०६ रोजी विधी अभ्यासकांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘लिगल कॉसमॉस’ या वार्षिकांकाचे थाटात प्रकाशन पार पडले. या वार्षिकांकाचे प्रकाशन माजी खासदार तथा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व सदस्य किशोर दर्डा यांनी केले. यावेळी अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुप्रभा यादगिरवार व प्रा.‌ स्वप्निल सगणे उपस्थित होते.

अमोलकचंद विधी महाविद्यालय दरवर्षी वार्षिकांक प्रकाशित करीत असते. या वार्षिकांकाच्या माध्यमातून विधी अभ्यासकांच्या लेखणीला वाव मिळतो. या वार्षिकांकात विविध विधी अभ्यासकांनी लेख, महत्त्वपूर्ण खटल्यांचे विवेचन, स्वरचित कविता आदी लिहील्या आहेत. या वार्षिकांकाचे प्रकाशक डॉ. सुप्रभा यादगिरवार, प्राचार्या, अमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळ असुन तर प्रा. स्वप्निल सगणे (मुख्य संपादक), प्रा. वंदना पसारी (सह – संपादक), प्रा. वैशाली फाळे (सह – संपादक), गोपाल चव्हाण (विद्यार्थी प्रतिनिधी) यांनी संपादन केले आहे. संपादकीय मंडळाला डॉ. सुप्रभा यादगिरवार, प्रा. डॉ. विजेश मुनोत, प्रा. डॉ. संदीप नगराळे, प्रा. अंजली दिवाकर व प्रा. छाया पोटे यांनी मार्गदर्शन केले.