Home नागपूर माहिती व जनसंपर्क व अधिपरीक्षक पुस्तके, प्रकाशने विभाग मुंबई यांनी “दैनिक नागपूर...

माहिती व जनसंपर्क व अधिपरीक्षक पुस्तके, प्रकाशने विभाग मुंबई यांनी “दैनिक नागपूर समाचार” शासनमान्य यादीतून वगळण्याबाबत पारीत केलेला आदेश उच्च न्यायालयाने केले रद्द – “उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा दनका”

623

दैनिक नागपूर समाचार वृत्तपत्रावर चार महिन्याचे आत महासंचालक माहिती व जनसंपर्क यांना सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे उच्च न्यायालय नागपूरचे आदेश 

नागपूर –  दि. 4 जाने. “दैनिक नागपूर समाचार” (RNI No.MAH/BIL/2006-18717) हे वृत्तपत्र नागपूर येथून सांध्य दैनिक म्हणून नियमित प्रकाशित होते व शासन मान्य यादीतील (लघु -क ) वर्गात सन 2009 पासून समाविष्ट आहे. तसेच सदर वृत्तपत्राला वेळोवेळी दरवाढ सुद्धा मिळाली आहे. दैनिक नागपूर समाचार वृत्तपत्राचे मुख्य संपादक *श्री.उमाशंकर नामदेव* हे आहे श्री. नामदेव यांनी माहिती व जनसंपर्क विभागातील तत्कालीन व विद्यमान अनेक संचालक नागपूर -अमरावती विभाग तसेंच जिल्हा माहीती अधिकारी,अधिपरीक्षक पुस्तके, प्रकाशाने या अधिकाऱ्यांनी केलेल्या अनिमित्तेबाबतच्या महासंचालक ते राज्यमंत्री व मुख्यमंत्री मंत्रालय, मुंबई पर्यंत अनेक तक्रारी पाठविले आहे. वरील तक्रारी मुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विभागीय चॊकशीस समोर जावे लागले होते. मागील काही काळापासून संचालक माहिती व जनसंपर्क नागपूर -अमरावती हे पद रिक्त होते या रिक्त पदावर हेमराज काशिनाथ बागूल यांची नियुक्ती करण्यात आली होती व बागुल यांना नागपूर या ठिकाणी संचालक पदावर काम करायचे होते तरी देखील हेमराज बागुल हा नागपुरात काम न करता मंत्रालय, मुंबई येथे बसून नागपूर येथील संचालक नागपूर विभागाचे काम पाहत होते. आणि हेमराज बागुल हे दर महिन्यात फक्त वेतन घेण्याकरिता नागपूर येत होते. त्यामुळे येथील अनेक वृत्तपत्राचे संपादक व पत्रकाराना वेळोवेळी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता, म्हणून श्री. नामदेव व इतर वृत्तपत्राच्या संघटनाचे पदाधिकारी यांनी नागपूर येथे नियमित संचालकची नियुक्ती करावी अशी मागणी पत्रव्यवहार करून मा. महासचालक व मुख्यमंत्री यांचेकडे करण्यात आली होती. वरील तक्रारीची दखल घेत अखेर दिनांक 18/9/2018 च्या शासन निर्णय नुसार हेमराज काशिनाथ बागुल यांची नियुक्ती संचालक, माहिती विभागीय कार्यालय नागपूर या पदावर दोन वर्षाच्या कालावधी साठी परिविक्षधीन नियूक्ती करण्यात आली नागपूर विभागात नियमित संचालक मिळाले असल्यामुळे वृत्तपत्राच्या अनेक संपादक /पत्रकाराना दिलासा मिळाला होता.
परंतु हेमराज बागुल यांची नियुक्ती नागपूर येथे करण्यात आली असल्यामुळे नागपूर येथे कायम स्वरूपात काम करावे लागेल असा गैरसमज हेमराज बागुल यांचे मनात निर्माण झाला. त्यामुळे हेमराज काशिनाथ बागुल हे नागपूर समाचारचे संपादक उमाशंकर नामदेव यांचे विरुद्ध वागू लागले. हेमराज बागुलची नागपूर येथे काम करायची मुळीच इच्छा नव्हती म्हणून हेमराज बागुल यांनी हेतूपुरस्सर उमाशंकर नामदेव यांचे दैनिक नागपूर समाचार हे वृत्तपत्र शासकीय यादीतून कसे वगळता येईल ही संधी शोधत होते. तरीही नागपूर समाचार नियमित सुरु होते आणि नागपूर समाचार हे वृत्तपत्र शासकीय यादीतून वगळता येणे हेमराज बागुल याला शक्य नव्हते व नागपूर समाचार वृत्तपत्राची काही त्रुटी काढता येतील का? याबाबत चे षढयंत्र हेमराज बागुल संचालक यांनी रचले व त्यांनी त्यांची सहाय्यक श्रीमती शैलजा दांधले -वाघ यांना आपल्या हाताशी धरले व नागपूर समाचार ची जानबुजून अनेक खोटी त्रुटी काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले हेमराज बागुल व त्याची सहाय्यक शैलजा या दोघांनी अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशाने यांचे सोबत संगनमत करून नागपूर समाचार शासकीय यादीतून वगळण्याबाबत निराधार प्रकरण तयार केले व खोटा अहवाल तयार केला. व त्यानंतर अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने यांनी दिनांक 22/6/2020 च्या पत्राद्वारे दैनिक नागपूर समाचार चे संपादक उमाशंकर नामदेव याचेकडून अनियमितता बाबत खुलासा मागविला होता व नागपूर समाचार चे संपादक तर्फे दिनांक 29/6/2020 रोजी सविस्तर खुलासा सादर केला. सदर खुलाश्या सोबत पुरेपूर दस्तऐवज देखील सादर केले होते.
अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने यांना कोणतेही वृत्तपत्राच्या मा. महासंचालक चे आदेशानुसार खुलासा मागण्याचे अधिकार असते व जे वृत्तपत्र आधीच शासन मान्य यादीतील समाविष्ट असतील त्या वृत्तपत्र यादीतून वगळण्याचे अधिकार अधिपरीक्षक यांना नाहीत. परंतु हेमराज बागुल यांचे सोबत संगनमत करून अधिपरीक्षक यांनी नियमाला डावळून जाहिरात वितरण धोरण नियमावली शासन निर्णय -2018 चे विरुद्ध जाऊन दिनांक 10/9/2020 रोजी आदेश काढले व त्या आदेशानुसार दैनिक नागपूर समाचार या वृत्तपत्राला शासन मान्य यादीतून वगळण्यातबाबतचे आदेश दिले.
दिनांक 10/9/2020 चे आदेश अधिपरीक्षक यांनी जारी करण्यापूर्वी दैनिक नागपूर समाचार चे संपादक यांना सुनावणीची संधी देखील दिली नाही संदेश प्रसार नियमावली -20/12/2018 च्या अंतर्गत असलेले तरतुदी 4.3.11 अनुसार कोणतेही वृत्तपत्रावर कारवाई करण्यापूर्वी वृत्तपत्राचे संपादक /व्यवस्थापक यांना बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. तसेच शासनमान्य यादीतील वृत्तपत्र काही कालावधी किंवा कायम सुरूपत शासन यादीतील वागळण्याचे अधिकार फक्त महासंचालक माहिती व जनसंपर्क यांना असतील परंतु नियमाची पूर्तता न करता तत्कालीन अधिपरीक्षक मंगेश बी. वरकड यांनी दैनिक नागपूर समाचार वृत्तपत्राला वगळण्याचे आदेश परीत केले.
वरील अधीपरीक्षक पुस्तके व प्रकाशने यांनी पारीत केलेल्या दिनांक 10/9/2020 च्या आदेशाला दैनिक नागपूर समाचार चे संपादक उमाशंकर नामदेव यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर येथे रिट याचिका क्रमांक 516/2021 दाखल केली या याचिकेत सचिव. माहिती व जनसंपर्क, महासंचालक, माहिती व जनसंपर्क, संचालक, नागपूर विभाग, अधिपरीक्षक, जिल्हामाहीती अधिकारी सह एकूण 6 अधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
वरील याचिकेची अंतिम सुनावणी दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती श्री. ए. एस. चांदुरकर व न्यायमूर्ती श्रीमती पुष्पा गणेडीवाल यांचे समक्ष घेण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने यांनी परीत केलेले दिनांक 10/9/2020 चे नागपूर समाचार यादीतून काढण्याचे आदेश सक्षम अधिकाऱ्यांनी परीत न केल्यामुळे तसेच नागपूर समाचार चे संपादक यांना सुनावणीची संधी देण्यात आलेली नाही असे निरीक्षण नोंदवून दिनांक 10/9/2020 आदेश रद्द करून उच्च न्यायालय यांनी सर्व त्रुटीचा सविस्तर उल्लेख करून मा. महासंचालक माहिती व जनसंपर्क मुबंई यांना निर्देशीत केले आहे की दिनांक 20/12/2018 च्या नियमावली नुसार या आदेशपासून 4 महिन्याचे आत दैनिक नागपूर समाचार वृत्तपत्रावर निर्णय द्या.

याचिकाकर्ते दैनिक नागपूर समाचारचे संपादक उमाशंकर नामदेव यांचे तर्फे एड़व्होकेट श्री. डी. बी. वलथारे तर प्रतिवादी तर्फे श्रीमती के. आर. देशपांडे यांनी युक्तिवाद केले.