Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे भव्य राज्य स्तरीय खंजेरी भजन स्पर्धा संपन्न..!

घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे भव्य राज्य स्तरीय खंजेरी भजन स्पर्धा संपन्न..!

363

⚫➡️ कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची आवर्जुन उपस्थिति..?

(अयनुद्दीन सोलंकी)

घाटंजी / यवतमाळ – महाराष्ट्र राज्यातील कलावंत व नामवंत कलाकारांनी देवधरी येथील आयोजित भजन स्पर्धेत सहभाग नोंदविला. राज्य स्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महीला प्रदेश संघटक प्रियंका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सारीका ताजने, यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सतिष भोयर, पार्डी (नस्करी) जिल्हा परिषदेचे सदस्य आशीष सुरेशबाबू लोणकर, घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक शंकरराव ठाकरे, घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मोरेश्वर वातीले या सह गुरुदेव सेवा भजन मंडळ देवधरीचे आयोजक आदींच्या हस्ते करण्यात आले. तब्बल चाळीस वर्षा नंतर या गावी “नभूतो ना भविष्य” अशी ही भजन स्पर्धा पार पडली. 1जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्यात 32 भजन स्पर्धा होत्या. पैकी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात “देवधरी हे गांव” दत्त तीर्थक्षेत्र म्हणून माहुर नंतर प्रख्यात आहे. या गावी मछिन्द्रनाथ यांचे आगमन झाले होते. त्यानंतर इथे दत्तप्रभु यांचा साक्षात्कार होऊन त्या मंदिराची उभारणी ललितामाता यांनी केली होती. ते श्रद्धास्थान आजही देवधरी या गावी पहायला मिळते. देवधरी या लहानशा गावात राज्य स्तरीय भजन स्पर्धा यशस्वी झाल्याने घाटंजी तालुक्यातील देवधरी हे गांव सद्यातरी चर्चेत आले आहे. या कार्यक्रमात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मोलाच वाटा आहे, असे आयोजकांनी आवर्जून सागितले.
➡️ सदरच्या भजन स्पर्धेत 37 भजन मंडळांनी सहभाग नोंदविला होता. तब्बल 25 भजन मंडळ उशिरा आल्याने व कोरोना नियमांचे पालन करीत आयोजकांनी त्यांचा प्रवेश नाकारला होता. 4 ते 5 दिवस चालणारी गरूदेव भक्तांची ही स्पर्धा कोरोना अभावी अवघ्या 2 दिवसांत आटोपती घ्यावी लागली.
➡️ या वेळी पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विनोद चव्हाण, रुग्णसेवक अंकुश ठाकरे व शेख रऊफ आदींना ‘सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
विशेष आकर्षण म्हणजे “चला हवा येउ द्या” फेम प्रवीणजी तीखे यांनी “बासुंदी” ही कविता सादर करून प्रक्षकांचे मने जिंकली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन गरूदेव सेवा भजन मंडळ, देवधरी व नायक फाऊंडेशन घाटंजी यांनी केले होते, हे विशेष. सदर कार्यक्रमाला घाटंजी तालुक्यातील गनमान्य नागरिकांनी हजेरी लावली होती.