Home मुंबई नवीमुंबई पोलिसांना माहित नसलेले अवैध धंदा सामाजिक कार्यकर्ते,पत्रकारांनी केमिकल ची चोरी उघडकिस...

नवीमुंबई पोलिसांना माहित नसलेले अवैध धंदा सामाजिक कार्यकर्ते,पत्रकारांनी केमिकल ची चोरी उघडकिस आणून गुन्हा दाखल करण्यास तुर्भे पोलिसांना भाग पाडले.

366
0

परंतु पुन्हा अवैध धंदे जोमाने सुरु कृपादृष्टि कोणाची ?

तर पुन्हा सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्याद्वारे अवैध धंदे उघडकिस आणून शासनास जागे करण्याचा निर्धार…!

नवीमुंबई/ प्रतिनिधी,

नवीमुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दित मस्तान व मोबीन आणि त्यांचे सहकारी मोठ्या प्रमाणात ट्रेलर जड वाहनातील विविध आकारमानातील लोखंडी सळय्यांच्या लाखों रूपयांची मालमत्तेची चोरी संबंधित डायव्हर च्या संगमताने रोज सायंकाळी पासून सकाळपर्यंत बिनबोभाटपणे सुरु आहे.तर दूसरीकडे गुन्हेगार प्रवृत्तींचे हरविंदर, गुलाब ,लंबू ,शाम होलिया,राजेश आणि त्यांचे पंधरा सहकारी फर्नेस,डांबर,काळे ऑईल,घातक व ज्वलनशील असलेले अनेक केमिकल द्रवरूप तरल पदार्थ,पेट्रोल, डिझेल, रॉकेल तसेच खाद्य तेलाची चोरी बुलेट टैंकर ,टैंकर डायव्हरच्या संगनमताने रोज करण्यात येत आहे.सदर अवैध धंद्यावर कारवाई होवू नये यासाठी प्रॉटेक्शन मनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड त्यांचे ऑर्डली वने यांचे मदत,प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संरक्षण खाली सुरु असल्याचे छाती ठोकपणे धंद्याचे चालक बोलत असतात.नवीमुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग व परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त पानसरे यांचे अवैध धंद्यावर कारवाईच्या आदेशाला हरताळ फासण्यात येत आहे.
अवैध धंदे प्रकरणी तक्रारदार यांनी तक्रार केली की नवीमुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांच्या मोबाईलवर केली की तत्काळ रिप्लाय येतो की,पोलीस परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त पानसरे यांच्या मोबाईल वर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे तक्रारदारास कळविले जाते.त्यानंतर पोलीस परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त पानसरे यांच्याद्वारे कोणत्याही स्वरूपाची कायदेशीर कारवाई अवैध धंदे आणि धंदेचालकांवर होत नसल्याचे पत्रकार,दक्ष नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे.तुर्भे एमआयडीसी मधील अवैध धंदेवाईकांनी पोलीस यंत्रणेला आपल्या दावणीला बांधले असल्याने कायदा- सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

नवीमुंबई मधील तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दित केमिकल, ऑईल चोरी करताना जर काही चुकीचा प्रकार घडला तर मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चुकून जर अशी घटना घडली तर आजू-बाजूला मोठ्या प्रमाणात असलेल्या कंपन्यांचेही नुकसान होईल, तसेच जिवितहानी सुध्दा होऊ शकते. याबाबत तुर्भे पोलीस स्टेशन, उपायुक्त, पोलीस आयुक्त कार्यलयात वेळोवेळी कळवून देखील धंदे बंद होत नाहीत. त्यामुळे पत्रकार व सामजिक कार्यकर्ते यांनी मिळून नोव्हेंबर २०२१ मध्ये तुर्भे एमआयडीसी तील केमिकल चोरी चा अवैध धंदा उघड केला होता. यावर थातुर मातुर गुन्हा नं. ३५३/२०२१ दाखल केला. परंतू आजही सदर धंदा चालूच आहे. सदर धंदे चालक व धंद्याची माहिती देवून ही पोलिसांनी गुन्ह्यात आरोपींच्या नावाचा उल्लेख करणे टाळले. यावरुन सदर धंद्यावर पोलिसांचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट होते. हे धंदे कधी बंद होणार. एखादी घटना घडून जिवितहाणी झाल्यावरच वरिष्ठांचे डोळे उघडणार का?
नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना दिसत नसलेले तुर्भे एमआयडीसी मधील केमिकल, डांबर, फर्नेस, पेट्रोलियम पदार्थ, खाद्य तेल व ऑईल चोरी आणि भेसळीचे अड्डे उघडपणे चालतात. वेळोवेळी पत्रकार, सामजिक कार्यकर्ते यांनी बरेचदा तक्रारी करुन सुध्दा राजरोसपणे धंदे चालूच आहेत. कायदा-सुव्यवस्थेला बाटीक बनविण्यात आले असून चोरी करतेवेळी माफियांची टोळी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनावर पाळत ठेवण्यासाठी व चोरी उघडकीस येवू नये यासाठी रस्त्यावर सदोदित चार मोटारसायकल, दोन चारचाकी वाहने यांचा येणे-जाणे सुरू असते. चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जिल्हा नागरी पुरवठा अधिकारी आणि जिल्हा अन्न व औषध आयुक्त यांच्या यांचे मदत, प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संरक्षण प्राप्त आहे असे स्थानिक लोक बोलतात.

रोज सकाळ ते रात्रभर आणि पहाटेपर्यंत चोरण्यात आलेला माल त्यांच्या जवळील असलेला टेम्पोमध्ये लागलीच प्लास्टिक व लोखंडी बॅरेलमध्ये पंपाद्वारे भरण्यात येतो. त्यानंतर नियोजित स्थळी असलेल्या गोडावून मध्ये लपविण्यात येतो. त्यांच्या जवळील असलेल्या अधिकृत परवानाच्या बोगस, बनावट बेल्टी चलनाद्वारे बाजारभावापेक्षा कमीदराने चोरण्यात आलेला माल व्यावसायिकांना विकण्यात येतो. अशाप्रमाणे कोट्यावधी रुपयांची काळी कमाई हेराफेरीतून मिळवून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकाचा विविध प्रकारचा कर महसूल बुडविण्यात येत आहे.

नवीमुंबई पोलीस आयुक्त,पोलीस परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त,तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना अवैध धंदे बाबत कारवाई चे पत्र देवूनही अवैध धंद्याचा बिमोड झाला नाही.चक्क पोलिसांना माहित नसलेले अवैध धंदा सामाजिक कार्यकर्ते,पत्रकारांनी मिळून दिनांक ०३/११/२०२१ रोजी रात्री केमिकल ची चोरी उघडकिस आणून तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८५/२०२१ प्रमाणे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले परंतु पोलीस अधिकारी यांचे मुख्य चोरांना गुह्यातून वगळणे, योग्य कलमे आणि तपास संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे.त्यानंतर पोलिसांच्या संगनमताने बंद करण्यात आलेले बेकायदेशीर धंदे काही दिवसांनी पुन्ह जोमात व खुलेआमपणे सुरु झाले मग अवैध धंद्याचा पोशिंदा कोण आहे? असा सवाल भ्रष्टाचार निर्मूलन समिती चे राज्य समन्वयक श्रीमती शोभा बल्लाळ यांनी मनपावृत्त साप्ताहिकातुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केला आहे.त्यांनी पुढे असे म्हटले आहे की अवैध धंदे बंद झाले नाहीत तर पुन्हा सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्याद्वारे अवैध धंदे उघडकिस आणून शासनास जागे करण्याचा निर्धार केला असल्याचे म्हटले आहेत.