Home मराठवाडा गोदावरी मनार पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गोदावरी मनार पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

19
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. २७ :- शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूल नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आरंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.खा.भास्कररावजी पाटील खतगावकर, उपाध्यक्ष श्री मधूकररावजी पाटील खतगावकर,यांच्या हस्ते महात्मा गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संस्थेचे सचिव डॉक्टर मीनल निरंजन पाटील खतगावकर(जि. प.सदस्या नांदेड)यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
तसेच शाळेचे प्राचार्य डी.पी.पांडेय यांनी प्रास्थाविकपर भाषणात शाळेच्या प्रगतीचा उंचा- वत जाणारा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतीय राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून सर्व सामान्य व्यक्तीला ताठ मानेने जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला आहे अशा या राज्यघटनेचा आपण आपण आपल्या विकासासाठी वापर करून घेतला पाहिजे तरच डॉक्टर आंबेडकर यांचे स्वप्न सत्यात उतरू राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळून दिले व हे स्वातंत्र्य राज्यघटनेरूपी सर्वसामान्यांना बहाल केले असे गौरवरूपी शब्दाने विध्यार्थ्यांना संभोधित केले या प्रसंगी संभाजी देशमुख, सरजित सिंग गिल,जगन्नाथ चकरवार, हरिप्रसाद लोहिया,गणपतराव मुंडे,दिलीप कोडगिरे,हणमंतराव पा.तोडे,शेषेराव पा.रोकडे, बाबाराव पा.रोकडे,(शिवसेना ता.प्रमुख) राजू गंदीगुडे ,सुंदरबाई पाटील (पं. स.सभापती बिलोली ) व पंचक्रोशीतील सर्व नागरिक,पालक ,पत्रकार,विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासप्रसंगी स्वाती दोमाटे, तेजप्रकाश तिवारी, सय्यद एल.बी.संतोष पाटील, भोसले उज्वला, तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम सूर्यवंशी, तर आभार जाधव श्यामसुंदर पाटील यांनी केले.