Home मराठवाडा अतिवृष्टीमुळे नुकसान न झालेल्या फळबागेचे अनुदान का दिले नाही,म्हणून कृषी कार्यालयात धिंगाणा,...

अतिवृष्टीमुळे नुकसान न झालेल्या फळबागेचे अनुदान का दिले नाही,म्हणून कृषी कार्यालयात धिंगाणा, अधिकाऱ्यांना रट्टे

260

जालना – लक्ष्मण बिलोरे

अतिवृष्टीने नुकसान न झालेल्या फळबागेचे अनुदान का दिले नाही,असे म्हणून पित्रापुत्रांनी अंबड तालुका कृषी कार्यालयात जावून कार्यालयात गोंधळ घालित व कृषि सहाय्यकास मारहाण करुन शिवागाळ केल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड तालुक्यातील दुनगाव येथील विष्णू भगवान जायभाये व आदीत्य विष्णू जायभाये,रा.दुनगाव यांची दुनगाव शिवारात शेती असुन अति पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा व मदत म्हणून अतिवृष्टी अनुदान वाटप सुरू करण्यात आले.

अंजीर पिकाचे नुकसान नसतानाही बोगस अनुदान का दिले नाही.म्हणून दोघांनी आज दुपारी १२ वाजता अंबड तालुका कृषी कार्यालयात जाऊन कृषि सहाय्यक अशोक सव्वासे यांना विचारले कि,आमचे अंजीर पिक अतिवृष्टिच्या अनुदान का दिले नाही,असे विचारले असता तेंव्हा कृषि सहाय्यक सव्वासे यांनी सांगितले कि,तलाठी व ग्रामसेवक यांच्या समक्ष  पंचनामा करुन अंजीर पिकाचे नुकसान आढळुन आले नसल्याने शासकीय नियमानुसार अनुदान वर्ग केले आहे.असे म्हणताच जायभाये पितापुत्रांनी कृषि सहाय्यकास शिवागाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

वाद सोडण्यासाठी कृषि सहायक संकेत डावरे,सुरेश डुकरे हे गेले असता त्यांना पण मारहाण करुन शिवीगाळ केल्याने कृषि सहाय्यक अशोक सव्वासे यांच्या फिर्यादीवरुन अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन संबंधित आरोपी विरुद्ध भांदवी ३५३,५०४,५०६ व ३४ आदि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे हे करत आहे.