Home विदर्भ YAVATMAL सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मोफत शिव भोजन...

YAVATMAL सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मोफत शिव भोजन थाळी

524

यवतमाळ – श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथील सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत शिव भोजन थाळीचे जेवण देण्यात आले.

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे मागील चार दिवसांपासून सहाय्यक प्राध्यापकांचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आंदोलन अस्थायी असलेल्या डॉक्टरांना शासनाने शासकीय सेवेत स्थायी करून घेण्याकरिता सुरू आहेत.महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी यांनी मागील ६-७ अशा बऱ्याच वर्षापासून अस्थायी स्वरूपात आपली वैद्यकीय सेवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देत आले आहेत .

करोणा काळात सुद्धा हे सहाय्यक प्राध्यापकांनी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिवस-रात्र राबून रुग्णांची सेवा सुरळीतपणे चालू ठेवली. शासनाने वारंवार सहायक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी यांना शासकीय सेवेमध्ये स्थायिक करून घेण्याचे वेळोवेळी आश्वासन दिले. परंतु या आश्वासनाने दोन वर्ष लोटून सुद्धा सहा सात वर्षापासून कार्यरत असलेल्या अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना व वैद्यकीय अधिकाऱ्यांना अजूनही शासकीय सेवेत स्थायी करून घेतले नाहीत. त्यामुळे मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रभर सहाय्यक प्राध्यापकांचे आंदोलन सुरू आहेत.

सुरुवातीच्या पहिल्या दिवसी कॅन्डल मार्च काढून शासनाचे लक्ष वेधले.

तर आज श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत शिव भोजन थाळी हया भोजना सह आपली सेवा देत गांधीगिरी च्या मार्गाने आंदोलन केले.असे विविध उपक्रम सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून राबवल्या जात आहेत.

परंतु शासन अजूनही या आंदोलनाची कुठलीही दखल घेताना दिसत नाही आहे.

यापूर्वीही सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बरेच आंदोलन केले परंतु ते आंदोलन शासनाने दिलेल्या केवळ आश्वासनाने मागे घेऊन रुग्णसेवा सहाय्यक प्राध्यापकांनी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरळीत सुरू ठेवली.हे गांधीगिरी पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास पुढे तीव्रपणे आंदोलन करण्यात येत असल्याचा इशारा सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.आंदोलनाचे एक स्वरूप म्हणून आज रुग्णांना व नातेवाईकांना शिवभोजन मोफत देण्यात आले .यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुरेंद्र गवारले, वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. शरद मानकर, डॉ. सचिन गरुड ,डॉ. विशाल नरोटे, डॉ.सतीश पवार, डॉ. अरविंद कुडमेथे, डॉ. सचिन दिवेकर, डॉ. सुचिता टेकाम, डॉ. स्नेहल जुमनाके, डॉ. महेंद्रा वरटी, डॉ.पल्लवी पंधरे, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. अनिकेत बुचे , डॉ.चेतन जनबादे , डॉ.जावेद ,डॉ. सचिन तोडासे , डॉ.सुवर्णा टाले व इतर सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.