Home विदर्भ माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटंजी येथे भाजपा...

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटंजी येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा संपन्न…!

525

⚫➡️ भारतीय जनता पक्षात काम करण्याची किंमत, अन्यथा बाहेरचा रस्ता दाखवणार –  हंसराज अहीर

(अयनुद्दीन सोलंकी)

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी येथील भारतीय जनता पार्टी व शहर यांच्या वतीने आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळावा सोनू मंगलम येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर हे होते. तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून यवतमाळचे माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आर्णी – केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे,
भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने, आर्णी विधानसभा प्रभारी दत्ताजी रहाने, जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, नगर परिषद प्रभारी भाविक भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन पारवेकर, घाटंजी पंचायत समितीच्या सभापती नीता आकाश जाधव, पंचायत समितीचे उपसभापती सुहास देशमुख पारवेकर, पंचायत समिती सदस्य कालिंदा रणधीर आत्राम, सावळी सदोबा येथील जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश राठोड आदीं मान्यवर उपस्थित होते.
➡️ कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा घाटंजी तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष मधुसूदन चोपडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन नगर परिषदेचे माजी सभापती प्रशांत उगले यांनी केले.
व्यासपीठावर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय पालतेवार, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष आकाश मारावार, घाटंजी तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष गुड्डू शुक्ला, रामसिंग राठोड, दत्ताजी कोंडेकर, भटक्या जाती व जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, पांढरकवडा भाजपाचे तालुका अध्यक्ष आनंद वैद्य, पांढरकवडा भाजपाचे माजी अध्यक्ष शंकर सामृतवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितिन नार्लावार, भरत पोतराजे, नंदकिशोर डंभारे, जितेंद्र कळसकर, अजय डेहनकर, मीरा तुळशिराम आत्राम, भाजपा यवतमाळ जिल्हयाचे नेते बंडु कदम, भाजपा अल्पसख्यांक आघाडी यवतमाळ जिल्हयाचे अध्यक्ष बशीर भाई, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई साखरकर, माजी नगराध्यक्ष राम खांडरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष भोयर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रकाश पाटील डंभारे, पारवा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष पोचारेडड्डी जिड्डेवार आदीं मान्यवर उपस्थित होते.
➡️ या वेळी उंदरणीचे सरपंच भगवान मेश्राम, महिंद्रा किनाके, उपसरपंच नीलेश खडसे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी बिपिन राठोड, दत्ता कोंडेकर, शंकर सामृतवार आदींना यवतमाळ जिल्हा भाजपाच्या जिल्हा कार्यकारणीत नियुक्ती देण्यात आली. घाटंजी तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष गुड्डू शुक्ला, नवनिर्वाचित भाजपाचे घाटंजी तालुका अध्यक्ष अध्यक्ष सुरेश डहाके यांचा पाहुण्याचे हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, आमदार डॉ. संदिप धुर्वे, भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, नगर परीषद प्रभारी दत्ताजी रहाणे, भाविक भगत आदींनी मार्गदर्शन केले. भाजपाचे नवनिर्वाचित घाटंजी तालुका अध्यक्ष सुरेश डहाके यांनी आभार मानले.
यावेळी भाजपाचे अशोक यमसनवार, संदीप माटे, भाजपा सरचिटणीस अशोक राठोड, भाजपा सरचिटणीस जीवन मुद्देलवार, प्रकाश खरतडे, भाजपा मिडीया सेलचे अभिजीत झाडे, राहुल खांडरे, भावेश सुचक, पुंडलीक वाढई भाजपा सरचिटणीस मनोज हामंद, स्वप्नील मंगळे, ललीताताई ठाकुर, चित्रकला देवतळे, प्रीतम हिवाळे, प्रणव वाघ, भाजपा मिडीया सेलचे गोपाल काळे, प्रमोद कदम, दिलीप पवार, अंकुश ठाकरे, विवेक उर्फ विक्की सुधाकर अक्कलवार, नाना मस्के, प्रमोद गिरी, किशोर ठाकरे, ओम बाजपेई, प्रभाकर चटुले, कुंदन ठाकुर, बंटी अटारा, वसंत काळे या सह भाजप व ईतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.