Home विदर्भ YAVATMAL येथे अनुसूचित जमाती (ST)प्रवर्गातील युवती व महिलांकरिता अन्न प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे...

YAVATMAL येथे अनुसूचित जमाती (ST)प्रवर्गातील युवती व महिलांकरिता अन्न प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे नि:शुल्क आयोजन

610

यवतमाळ (प्रतिनिधी) – जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ व्दारा पुरस्कॄत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यवतमाळ व्दारा आयोजित नि: शुल्क अन्न प्रक्रिया प्रशिक्षण यवतमाळ येथे दि. २८/१२/२०२१ ते ०१/०२/२०२२ या कालावधीत आयोजित केले आहे. सदर प्रशिक्षणात अन्न प्रक्रिया चे तांञिक प्रशिक्षण थेअरी व प्रात्यक्षिकासहित देण्यात येईल .उदा आवळा कॅंडी , जॅम- जेली,टोमॅटो सॉस , केक ,नानखटाई , बिस्कीट इ . तयार करणे तसेच या प्रशिक्षणात उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास,सुसंवाद कौशल्य, विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन,उद्योगाचे व्यवस्थापन बाजारपेठ संशोधन प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करणे इत्यादींचे मार्गदर्शन करण्यात येईल. सदर प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवाराने आपली नोंदणी दि .२७/१२/२०२१ पर्यंत करणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षणाकरिता ३० उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे करण्यात येईल.या प्रशिक्षणाकरिता वय १८ ते ४५ शिक्षण किमान ७ वी उतीर्ण, आवश्यक कागदपञे टीसी, मार्कशीट, आधार कार्ड व चालु असलेले बँक खाते झेरॉक्स , २ पासपोर्ट फोटो इ.

सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपञ व विद्यावेतन देण्यात येईल. अधिक माहीती व संपर्कासाठी एमसीईडी कार्यालय उद्योग भवन ३रा माळा दारव्हा रोड यवतमाळ फोन न . ०७२३२-२४५३५५ येथे दि . २७/१२/२०२१ पर्यंत प्रत्यक्ष संपर्क साधावा व या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी एमसीईडी यवतमाळ यांनी केले आहे.