Home विदर्भ प्रहार जनशक्ती पक्षाचे रंजित गराड यांचा दणदणीत विजय भाजप समर्थीत अमोल उमाटे...

प्रहार जनशक्ती पक्षाचे रंजित गराड यांचा दणदणीत विजय भाजप समर्थीत अमोल उमाटे पराभूत

230

प्रतिनिधी-प्रमोद झिले,येरला

वर्धा –  हिंगणघाट पोटनिवडणुक टेंभा ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रं.2 चे उमेदवार रंजीत गराड यांनी अमोल उमाटे यांना 25 मतांनी मात देत विजयश्री खेचून आणला.

हिंगणघाट तालुक्यात 17 डिसेंबरला झालेल्या टेंभा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रंजीत गराड यांनी भाजप समर्थीत सरपंच गटाचे अमोल उमाटे यांचा पराभव करीत ग्रामपंचायत मध्ये एंट्री केली या निवडणुकीत रंजीत गराड यांना 149 तर अमोल उमाटे यांना 119 मते पडली . या विजयामुळे प्रहार जनशक्ती पक्ष आता हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात ग्रामीण भागात पाळेमुळे पसरवित असल्याचे दिसून येते.