Home विदर्भ गुरुदेव युवा संघाने दिली निराधाराना मायेची ऊब चिकणी येथे दत्त जयंती निमित्त...

गुरुदेव युवा संघाने दिली निराधाराना मायेची ऊब चिकणी येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम

468
प्रतिनिधी – यवतमाळ
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा , देव् तेथेची जाणावा हे संताचे वचन उराशि बाळगुन सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणार्‍या गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी वृद्ध निराधाराना मायेची ऊब दिली. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत आहे. अशातच ग्रामीण भागातील निराश्रीताना,वृद्ध निराधाराना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो. अनेक निरार्शित वृद्ध थंडीत कुड.कुड.कुत असतात.
त्यांचा थण्डीपासुन बचाव व्हावा याकरिता यवतमाळ येथील गुरुदेव युवा संघाचे वतीने चिकणी येथील  दत्त मंदिर परिसरात वृद्ध निराधार पुरुष व महिलांना ब्लेकट वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबविन्यात आला. याचा अनेकांना लाभ मिळाला .गुरुदेव युवा संघाच्या या उपक्रमाने ग्रामीण भागातील  वृद्ध निराधाराना मायेची ऊब मिळाल्याने भाराउन गेले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी निराधाीर व दिव्यांग यांना शासकीय योजना मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. या कार्यक्रमाला गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, चिकणी चे सरंपच नाना डोंगे, उपसरपंच पवन अडसुळ, यासह चिकणी परिसरातील नागरीक, ग्राम पंचायत सदस्य, तसेच गरजु, दिव्यांग, निराधार यांना यावेळी वाटप करण्यात आले.