
जालना – लक्ष्मण बिलोरे
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने १११ आजी माजी सैनिकांना वीर शौर्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

कार्यक्रमासाठी उद्घाटक मा श्री प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर राष्ट्रीय अध्यक्ष,कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष श्री उल्हास दादा पाटील माजी सैनिक , विशेष अतिथी श्री उमेश दादा पाटील खासदार जळगाव लोकसभा, श्री राजीव दादा देशमुख माजी आमदार चाळीसगाव विधानसभा, श्री मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगाव विधानसभा, श्रीमती मनिषा ताई चव्हाण नगराध्यक्ष नगरपालिका चाळीसगाव, प्रमुख पाहुणे गिरीराज मही राव राष्ट्रीय समन्वयक सुनिता पाटील कसबे राष्ट्रीय प्रवक्ता प्रमुख अतिथी एडवोकेट राणीताई स्वामी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री अरुण चव्हाण देशमुख प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य एडवोकेट विजय भाऊ पवार विधी विभाग प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा बोरसे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, श्री संतोष पाटील ठाकरे आयटी सेल प्रदेशाध्यक्ष ,अनिल देसले जिल्हाध्यक्ष धुळे ,महेश पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव, श्रीमती शोभा ताई पाटील जिल्हाध्यक्ष महिला आघाडी जळगाव, श्रीमती अंजनाताई राजपूत महिला आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद, मायाताई कोळी तालुकाध्यक्ष धरणगाव, राजेंद्र पाटील तालुका अध्यक्ष चाळीसगाव व राज्यातील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यात सैनिकांना वीर शौर्य पुरस्कारांनी प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप बाबा पाटील यांनी सैनिकांच्या देश सेवेविषयी आणि सैनिकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर संघटनेतील पदाधिकारी चांगले काम करते त्यांना महापुरुषांच्या प्रतिमा मूर्ती व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी श्री अरुण चव्हाण देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची यांची प्रतिमा विचार प्रतीक म्हणून देण्यात आली व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गिरीराज महेश राव यांना तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा विचार प्रतीक म्हणून देण्यात आली व देऊन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच एडवोकेट विजय पवार सर यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा विचार प्रतीक म्हणून देण्यात आली व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अरुण चव्हाण देशमुख प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी केले व आभार प्रदर्शन ही यांनी केले यात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती कशा पद्धतीने काम करते यावर अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला आणि जे आपले वीर सैनिक देश सेवा करतात म्हणून आपण आपल्या घरी आपल्या गावात आपल्या राज्यात आपल्या देशात सुरक्षित आहोत असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप बाबा पाटील यांनी केले आणि दुसऱ्या सत्रात सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र टीम व जळगाव जिल्हा तसेच धुळे जिल्हा टीमने खूप मेहनत घेतली.











































