
अमीन शाह
बुलडाणा ,
मागील दहा ते बारा वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन आदिल शाह फारुकी बहुउद्देशीय संस्था जळगाव खानदेश द्वारे मान्यवरांच्या हस्ते जळगाव येथील अल्पबचत भवनात हा महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार देण्यात आला आहे.
चिखली येथील प्राध्यापक पत्रकार तनजीम फारुक हुसैन यांनी शिक्षण,विधी,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात मागील दहा ते बारा वर्षा पासून आपले योगदान देत आहेत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक अनमोल कार्याची दखल घेत जळगाव खान्देश येथील आदिल शाह फारुकी बहुद्देशीय संस्थेने कडून त्यांना मानाचा मानला जाणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला.
चिखली येथील प्राध्यापक पत्रकार तनजीम फारुख हुसैन यांनी विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये काम केले आहे व सध्या ते दै.लोकमत समाचार चिखली चे तालुका प्रतिनिधी असून त्यांनी एम.एस.सी बी.एड पर्यंत शिक्षण घेतले असून त्यांनी एल.एल.बी चे सुद्धा शिक्षण घेतले आहे. समाजात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या कामाची दखल ही जळगाव खानदेश येथील आदिल शाह फारुकी बहुद्देशीय संस्था यांनी घेऊन त्यांना मानाचा असा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2021 देण्यात आला हा पुरस्कार त्यांना जळगांव खानदेश येथे 28 नोव्हेंबर ला जळगाव खानदेश येथील अल्पबचत भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार जळगाव हे होते तर अंकुर साहित्य परिषद सहसचिव हकीम आर चौधरी मुक्ताईनगर,लोकनियुक्त सरपंच भावना माळी ,सरकारी वकील कलंत्री, अब्दुल मजीद जकरीया, अब्दुल करीम सालार,संभाजी ब्रिगेड चे दिनेश भाऊ कदम मुक्ताईनगर,मण्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष फारूक शेख,अल्पसंख्यांक सेवा संघाचे अध्यक्ष जहांगीर खान,हाजी फजल सेठ ,रि. मुख्या. फारूक पटेल अडावद,मुख्याध्यापक शब्बीर अहमद, पीआर माळी अडावद,इम्रान खान,जहांगीर पठाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी केले तर जावेद शेख यांनी आभार व्यक्त केले. प्रा.तनजीम हुसैन यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केलजात आहे











































