Home विदर्भ कौमी तनझीम च्या वतीने आ. डॉ. वजाहात मिर्झा यांचा भव्य स्वागत…!

कौमी तनझीम च्या वतीने आ. डॉ. वजाहात मिर्झा यांचा भव्य स्वागत…!

175

यवतमाळ – मुस्लिम समाजा मध्ये महत्त्वाचे असणारे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड वर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहात मिर्झा यांची अध्यक्ष पदी (राज्यमंत्री दर्जा) बिनविरोध निवड झालेली असून प्रथमच यवतमाळ आगमनानिमित्त ऑल इंडिया कौमी तंजीम, यवतमाळ जिल्हा व मुस्लिम समाजातर्फे शारदा चौक येथे मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येऊन आमदार डॉक्टर वजाहात मिर्झा यांचा भव्य असा स्वागत करण्यात आले तसेच समाजामध्ये मिठाई वाटून आनंद साजरा केला.

महाराष्ट्र राज्य वक्त बोर्ड हे मुस्लिमांसाठी अतिमहत्त्वाचे असणारी संस्था आहे या संस्था अंतर्गत मुस्लिम समाजातील मज्जिद, कब्रस्तान, दर्गा इत्यादी येतात आ.डॉ. वाजाहात मिर्झा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्ह्या व विदर्भाचे लोकांची त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेली आहे असे लोकं कडून सांगण्यात आले.

याचा उत्तर देताना आ.डॉ. वजाहत मिर्झा म्हणाले महाराष्ट्र मध्ये वक्फ बोर्डाची हजारो हेक्टर जमिनी आहे या जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केलेला असून त्या जागा खाली करून मुस्लीम समाजाला हे जमीन परत मिळवून देऊ अशी गवई आ.डॉ.वजाहात मिर्झा यांनी दिली या स्वागताच्या कार्यक्रम चे वेळी ऑल इंडिया कौमी तांझीम चे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद आसिम आली यवतमाळ जिल्ह्याच्या अध्यक्ष मिर्झा वासीम बेग सामाजिक कार्यकर्ते मौलवी मुमताज हकीम, मुजाहिद खान, अत्तू काजी, जुनेद फौझुल अजीम, बाबा भाई, शेख एजाज, परवेज कश्मीरी, साकिब खान इत्यादी उपस्थित होते