Home जळगाव टी इ टी परीक्षार्थींसाठी धावल्या शुभांगी ताई पाटील , विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळाला...

टी इ टी परीक्षार्थींसाठी धावल्या शुभांगी ताई पाटील , विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळाला प्रवेश

428

रावेर (शेख शरीफ)

20/11/2021रोजी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी इ टी परीक्षा आयोजित केलेली होती.या परीक्षेचा पहिला पेपर सकाळी 11 वाजता सुरू होणार होता व त्यासाठी परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची वेळ 10:30 वाजेची देण्यात आली होती.
परंतु एस टी बस चा संप असल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी गाड्यांनी परीक्षेला येतांना अनेक अडचणींना तोंड देत परीक्षा केंद्रांवर पोहोचावे लागले त्यामुळे काही विद्यार्थ्यांना पोहोचण्यास पाच- दहा मिनिटे विलंब झाला व त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात येता यावी व त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन च्या संस्थापक तसेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन च्या राज्याध्यक्षा शुभांगी ताई पाटील यांनी स्वतः विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन संबंधित परीक्षा केंद्रांचे केन्द्र प्रमुख तसेच परीक्षा अधिकारी यांना भेटून या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला त्यामुळे अनेक परीक्षार्थींना परीक्षा देता आल्यामुळे विद्यार्थी व त्यांचे पालकांनी समाधान व आभार व्यक्त केले.