Home जळगाव शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव राज्यस्तरीय बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाची घोषणा

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव राज्यस्तरीय बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाची घोषणा

301

डॉ. श्रीकांत पाटील संमेलनाध्यक्ष तर डॉ. सतीश तराळ उद्घाटक आणि हकिम आर. चौधरी संमेलनाचे संयोजक पदी निवड

रावेर ( शेख शरीफ)

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचा जळगाव व बुलढाणा जिल्हा दक्षता समित्यांचा मेळावा मुक्ताईनगर येथील जुने कोथळी मंदिर या ठिकाणी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावन भूमीत नुकताच थाटात संपन्न झाला.याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या शुभाहस्ते आदिशक्ती संत मुक्ताई व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांचे दीपप्रज्वलन करून पूजन करण्यात आले अकोला
येथील ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा नुकताच संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुक्ताईनगर पंचायत समितीचे सभापती विकासभाऊ पाटील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब औरंगाबाद येथील समाजसेवक रमेशअण्णा मुळे रायगड येथील साहित्यिक अशोक शिरसाट औरंगाबाद येथील साहित्यिक डॉ.सुभाष बागल आणि जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील फाऊंडेशनचे दक्षता समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा थाटात संपन्न झाला याप्रसंगी मान्यवरांचा शाल व बुके देऊन फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ शिवचरण उज्जैनकर यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या गेल्या १४ वर्षातील कार्याविषयी तसेच लोकडाऊनच्या काळातील ऑनलाईन विविध उपक्रमांची माहिती दिली त्याचप्रमाणे त्यांनी बाल दिनाचे औचित्य साधून शिव राज्यस्तरीय बाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाची घोषणा केली हे पहिले संमेलन मुक्ताईनगर येथे २५ डिसेंबरला घेण्याचे त्यांनी घोषित केले तर हे संमेलन राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येईल अशीही उज्जैनकर यांनी घोषणा केली या पहिल्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून कोल्हापूर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ.श्रीकांत पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. सतीश तराळ अमरावती यांची उद्घाटक म्हणून तर या संमेलनाचे संयोजक म्हणून श्री हकीम आर. चौधरी यांच्या नावाची उज्जैनकर यांनी घोषणा केली.प्रसंगी मान्यवरांनी उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्याविषयी कौतुक केले यावेळी उज्जैनकर यांना मिळालेल्या डॉक्टरेट व डिलीट बद्दल मान्यवरांनी त्यांचा सपत्नीक सौ संगीता उज्जैनकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रसंगी उज्जैनकर यांनी उज्जैनकर फाउंडेशनचा कार्यविस्तार होण्यासाठी जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा दक्षता समित्यांची निर्मिती करून त्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र सुद्धा प्रदान करण्यात आले याचवेळी त्यांनी राज्यातील १८ जिल्ह्यातील मान्यवरांच्या नावाची जिल्हा समन्वयक म्हणून घोषणा सुद्धा केली. या कार्यक्रमाचे सुरेल सूत्रसंचालन शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा दक्षता समितीचे सचिव प्रा.राजकुमार कांकरिया व जिल्हा महिला प्रमुख श्रीमती ज्योतीताई राणे यांनी केले तर आभार श्री विनायक वाडेकर यांनी केले. याप्रसंगी रायगड, औरंगाबाद, चिखली-मेहकर, खामगाव, नांदुरा, मलकापूर बुलढाणा, अकोला, जळगाव येथील फाऊंडेशनचे आजीव सभासद तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.