Home विदर्भ आमदार सागतील तेव्हा खावटी किट वाटप केल्या जाईल 

आमदार सागतील तेव्हा खावटी किट वाटप केल्या जाईल 

415

माणिकपूर येथिल मुख्याध्यापक मिसळ यांचे व्यक्तव्य 

मनिष गुडधे

अमरावती‌ – वरुड तालुक्यातील 13 ते 14 गावातील राहणारा आदिवासी समाज शासनाच्या खावटी योजनेपासून वंचीत असून कोरोना संपत आला असून योजनेचा लाभ आदिवासी गरीब शेत मजूरी करणारा आदिवासी बांधवाना मिळत नाही ,असे जिल्हा अध्यक्ष अर्जुन युवनाते कमलणारायन उईके, राजेश उईके, राजू मरकाम, राजेश धुर्वे ,धर्मेंद्र कोकडे अभिषेक जाधव, यांच्या समोर काही गावातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्या नंतर वरुड तालुक्यातील बिरसा क्रांति दलाचे युवा पदाधिकारी यांना घेऊन माणिकपूर येथील आश्रम शाळेला भेट दिली असता अक्षरशः माणिकपूर येथे 350 खावटी किट गोडाऊन मध्ये 20 दिवसापासून पडून आहेत ,यात मंजूर असलेल्या गावातील आदिवासी गरजू लाभार्थी यांना वाटप झाले नसून मुख्यध्यापक यांनी शिष्टमंडलळा असे सांगण्यात आले की, आमदार कार्यक्रम लावतील तेव्हा आम्ही वाटप करू तसे आम्हाला निर्देश आहे, कोरोना काळात आदिवासी समाजला कोणत्याही लोक प्रतिनिधी यांनी मदत केली नसून आता फक्त श्रेय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आदिवासी खावटी योजनेचा वापर करून समाजाला योजने पासून वंचित ठेवण्याचे काम करीत असेल तर बिरसा क्रांति दल तर्फे अशा बाबींचा जाहीर निषेध करीत असून कोणाचे लाड पुरविण्यासाठी आदिवासी समाजाच्या योजनेचा वापर लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी करीत असेल तर अश्या मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात यावे , अशी भूमिका येणाऱ्या काळात संपूर्ण आदिवासी समाज संघटन घेईल । अश्या राजकारणी लोकांच्या दबावात काम करणाऱ्या आदिवासी विभाग कार्यलयातील कर्मचारी यांची विभागाला गरज नसून अश्याना बडतर्फ करावे, आज अश्या शासकीय कर्मचारी मुळे तिवसाघाट पेठ मांगरुळी रोषणखेडा सुरळी कुरळी ढगा धनोडी राजुरा बाजार वडाळा , वंडली वघाळ चांदस वाठोडा , 
खडका पांढरघाटी मुसळखेडा , आमपेंड बेलोरा आलोडा
परासवाडा अश्या किती तरी गावांना आदिवासी खावटी योजनेचा लाभ मिळत नसून ही आदिवासी विकास विभागाची निदनिय बाब आहे,