Home विदर्भ का बिघडली अमरावतीची परीस्थीती??

का बिघडली अमरावतीची परीस्थीती??

903

नक्की काय घडल…!

अमरावती – ( मनिष गुडधे ) –  त्रिपुरामध्ये घडलेल्या तथाकथित घटनेनंतर अमरावती शहरामध्ये १२ नोव्हेंबर रोजी मुस्लिम बांधवांकडून विनापरवानगी अचानक मोर्चा काढून त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होते. याचवेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या काही व्यक्तींकडून शहरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील वातावरण चांगलेच तापले होते.या घटनेनंतर भारतीय जनता पक्षासह इतर हिंदु संघटनांनी १३ नोव्हेंबर रोजी अमरावती बंद चे आवाहन केले होते. या आवाहनाला अमरावतीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. लाखोंच्या संख्येने हिंदूंनी शहरातील राजकमल चौकामध्ये गर्दी जमवली.या दरम्यान प्रचंड घोषणाबाजी झाली, तसेच या आंदोलनादरम्यान काही ठीकाणी बरीच तोडफोड झाली. इतक्या प्रचंड प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरल्यामुळे पोलीसांच्या हातुन परीस्थिती हळूहळू निसटत चालली होती. यावेळी ग्रामीण पोलीसांसह नागपूरहून अतिरीक्त पोलीसांची कुमक बोलवण्यात आली. तरीही परीस्थिती नियंत्रणात येत नसल्याने पोलीसांनी काही ठीकाणी सौम्य लाठीचार्ज केला, अश्रुधूराच्या नळकांड्या सोडल्या यासोबतच राजकमल चौकामध्ये जमलेल्या जमावाला पांगवण्याकरीता पाण्याचे फवारेही उडवण्यात आले. या आंदोलनादरम्यान आज पत्रकारांसह काही पोलीसही जखमी झाले.सकाळीच १० वाजतापासून राजकमल चौकासह शहरामध्ये जमलेली ही गर्दी ३ वाजता हळूहळू कमी होत गेली, त्यानंतर या आंदोलनाची तीव्रताही कमी झाली होती. त्यामुळे पोलीसांना योग्य नियोजन करून परीस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.एकुणच या घडलेल्या प्रकारामुळे अमरावतीमधील संपुर्ण परीसरात तणावाची परीस्थिती निर्माण झाली होती. यानंतर अमरावतीमध्ये संचारबंदीही जारी करण्यात आली. वैद्यकीय कारणांव्यतिरीक्त इतर कारणासाठी बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली, सोबतच एका ठीकाणी चार पेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली.सायंकाळी ६ वाजतानंतर शहरासह आसपासच्या परीसरातील इंटरनेटसेवाही बंद करण्यात आली. सध्या अमरावतीमध्ये ४ दिवसांची संचारबंदी जारी करण्यात आली आहे.