Home नांदेड नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये-जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये-जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे

578

महेंद्र गायकवाड

नांदेड – नांदेड येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने काही समाजकंटक सर्वसामान्य जनतेमध्ये अफवा पसरून तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच इतर समुदायाच्या भावना दुखावतील असे मेसेज किंवा व्हिडिओ अथवा पोस्ट व्हायरल करू नयेत. अशा समाजकंटकांवर नांदेड सायबर सेलचे बारीक लक्ष असून जे कोणी अशा प्रकारचे कृत्य करतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिला आहे.