Home जळगाव त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तहसीलदारांना...

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन

162

रावेर (शेख शरीफ)

मुस्लिमांच्या धार्मिक भावना भडकाऊन देशात ऊद्रेक केला जात आहे , जेव्हा जेव्हा देशात निवडणुका लागतात , ओबिसींची जातीआधारीत जनगणनेचा मुद्दा येतो , तेव्हा तेव्हा हिंदु – मुस्लिम असा वाद निर्माण केला जातो व ओबिसींचा जनगणनेवरुन लक्ष भटकवुन दंगलीकडे वळविले जाते , जेव्हा ओबिसींची जातीआधारीत जनगणनेचा मुद्दा येतो तेव्हा बाबरी मज्जिद पाडली जाते , ऑपरेशन ब्लु स्टार केला जातो , शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात मुद्दाम सैनिक घुसवून शिखांच्या धार्मिक भावना भडकाऊन दंगली जातात , आजही भारत देशात बामसेफ भारत मुक्ती मोर्चातर्फे संपूर्ण भारत देशात ओबिसींची जातीआधारीत जनगणनेचा मुद्दा घेऊन जागृती केली जात आहे , आणी ओबिसी ची जागृती झाली नको पाहिजे , म्हणुन त्रिपुरा राज्यात मुस्लिम केल्या : बांधवांवर अन्याय अत्याचाराचे सत्र विश्व हिंदू परिषद आर एस एस द्वारे केले जात आहे , म्हणुन भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मा . नितिन या गाढे यांनी आंदोलनात सहभागी होऊन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ला समर्थन देऊन विश्व हिंदू परिषदेचा निषेध केला व ईशारा केला जेव्हा आम्हाला अवसर मिळेल तेव्हा भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही या ब्राम्हणवाद्यांचा , या आर एस एस च्या गुंडांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा चोख इशारा दिला , प्रसंगी जम अते ईस्लामि हिंद रावेर युनिट चे शेख शफिउद्दीन सर , नगरसेवक आसीफ मोहंमद , मुस्लिम पंचायत कमिटि चे शेख गयास शेख रशीद , नगरसेवक सादिक शेख अ . रफीक अ.अजिज शेख अजमोद्दीन शेख करीम , शेख जुबेर शेख जहीर फहिम शेख , शेख कलिम मेंबर म असलम शेख हनिफ शेख आणि इतर सर्व म जलुम साथिदार उपस्थित होते .