
प्रतिनिधी:- प्रमोद झिले येरला हिंगणघाट
वर्धा – हिंगणघाट तालुक्यातील वेणी गावातील स्वस्त धान्य दुकानात तांदळात सोंडे, जाळे आणि उंदराच्या लेंडया आढळल्या मुळे शासनाकडून मिळत असणाऱ्या खाण्या अयोग्य धान्य बाबत वेणी वासि्यांनी स्वस्त धान्य दुकानदारा कडे बेकार आणि अयोग्य धान्या बाबत तक्रार केली. जवळ पास तीन महिन्यापासून वेणी गावात बेकार आणि खाण्या अयोग्य धान्य मिळत आहेत. स्वस्त धान्य दुकानंदार यांनी वेळोवेळी अयोग्य धान्याचे फोटो आणि तक्रार करुन सुद्धा लक्ष देत नसल्याचे सांगायत आले. गरिबाला धान्य देतो व त्याच्या मुलाचे परिवाराची मोफत धान्य पुरवठा देऊन त्यांचे जीवन उंचावितो असे भाषणात बोलणारे शासनाचे पदाधिकारी आहेत तरी कुठे हा प्रश्न गावाकऱ्या समोर उभा आहेत. स्वस्त धान्या मध्ये विटा, माती , जाळी आणि उंदरच्या लेंडया आढळून सुद्धा शासन बेजबाबदार का? शासनाचा अन्न पुरवठा विभाग झोपलेला आहेत काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना गावातील सर्व नागरिकांनी स्वस्त धान्या पुरवाठा दुकानात धाव घेऊन बेकार आणि अयोग्य धान्या बाबत तक्रार केली. आता शासन याकडे कितपत लक्ष देईल की गरिबाना असे बेकार धान्य खाऊ देणार असे प्रश्न गावातील सर्व नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानदार यांना विचारले. शासनाने याकडे लवकर लक्ष न दिल्यास स्वस्त धान्य वर बहिष्कार टाकून याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू असे मत गावकऱ्यांनी पत्रकाराकडे व्यक्त केले.
स्वस्त धान्य दुकानादार यांचे मत :-
मी मागील तीन महिन्यापासून धान्या मध्ये विटा, जाळे आणि उंदराच्या लेंडया येत होत्या मी त्याचे फोटो काडून वारंवार वरीष्ठाला पाठविले पण कोणीही यावर कोणतीही कार्यवाही करून धान्य पाठविण्यात सुधारणा केली नाही. म्हूणन माझी शासनाला विनंती आहेत की आपण धान्य ची योग्य चौकशी करूनच स्वस्त धान्य दुकानात पाठवावे.
*पुरुषोत्तमजी वेले, स्वस्त धान्य दुकानदार वेणी*










































