
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
३०आॅक्टोंबर २०२१ शनिवार रोजी बाणेगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे बाणेगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या पोक्रा योजनेमधून औजार बॅंकेचे लोकार्पण सोहळा शिवसेना सहसंपर्कप्रमुख हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते करण्यात आला.

अतिवृष्टीमुळे बाणेगाव व पंचक्रोशीती शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कंपनीचे अध्यक्ष पुरुषोत्तम उढाण यांनी शेतकऱ्यांना डिझेल तुमचे ट्रॅक्टर आमचे ही अल्प दरात एकरी २०० रुपये व एकरी लागेल तेवढे डिझेल टाकून अभीनव अशी योजना सुरू केली या मुळे शेतकऱ्यांना कमीतकमी एकरी ५०० रुपयांचा फायदा होईल.
शासनाच्या नियमानुसार एकुण रक्कमे पैकी १०% सुट देणे अपेक्षित असताना फक्त डिझेल घेऊन एकरी २०० रुपयात अशी योजना सुरू करणारी बाणेगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी ही घनसावंगी तालुक्यातील नव्हे तर जालना जिल्ह्यातील पहीली कंपनी आहे असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी श्री रोडगे साहेब यांनी केले तर शासन शासनाच्या नियमानुसार जशी अतिवृष्टी भागात मदत करते तशीच मदत शेतकऱ्यांना करण्याच्या हेतूने ही अभीनव योजना सुरू केली असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्कप्रमुख हिकमत दादा उढाण यांनी केले.
या कार्यक्रमाला भोगगावं,सौंदलगाव, विठ्ठलनगर,शेवता,लिंगसेवाडी,मुरमा, कंडारी अंबड,रामसगाव,जोगलादेवी सह पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिकमत दादा उढाण तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषि अधिकारी श्री रोडगे साहेब, पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री कदम साहेब हे होते या कार्यक्रमाला घनसावंगी तालुकाप्रमुख उद्धव मरकड, अंबड तालुकाप्रमुख पंकज सोळंके, पंचायत समितीचे गटनेते अनिरुद्ध शिंदे, पंडित धांडगे,रंजीत उढाण, दादासाहेब थेटे, रमेश बोबडे, अणिल सानप, विलास बापु उढाण, भिमाशंकर मुळे,संभातात्या उढाण, सरपंच नारायण गायकवाड, गणेश काळे,रामजी मोहीते, मधुकर खरात, शिवाजी होंडे, सिताराम खोजे,बंडुभाऊ बुलबुले सह शेतकरी उपस्थित होते.











































