Home विदर्भ पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांचा जामा‌ मस्जिद कमेटी तर्फे सत्कार..!

पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांचा जामा‌ मस्जिद कमेटी तर्फे सत्कार..!

229

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) – पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी अवैध धंद्याविरोधात सूरू केलेल्या धडक मोहीमेचे समर्थन करत सावळी (सदोबा) येथील जामा मस्जिद कमेटीच्या पदाधिकांऱ्यानी ठाणेदार विनोद चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पारवा पोलीस स्टेशनला काही दिवसांपूर्वी ठाणेदार म्हणून रूजू झालेल्या विनोद चव्हाण यांनी पारवा पोलीस स्टेशनचे सुत्रे हाती घेताच अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणारे अनेक जण भुमिगत झाले आहे.
सर्व सामान्य नागरिकांत ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या बाबतीत चांगल्या प्रतिक्रिया ऊमटू लागल्या आहे. मंगळवारी मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादुन्नबी हा सण जामा मस्जिद मध्येच साजरा केला. त्यावेळी ठाणेदार चव्हाण यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने जामा मस्जिद कमेटीच्या पदाधिकांऱ्यानी सत्कार केला.
यावेळी जामा मस्जिद कमेटीचे अलहाज़ शेख बब्बुभाई, अलहाज़ निजामोद्दीन सर्वे, सैयद गफारभाई, युसुफ पठाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, जाऊद्दीन सर्वे, आसीफ सुमार, राजू सर्वे, रोशन सोलंकी, शौकत गौरी, अयुब कुरेशी व मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होती