Home विदर्भ ट्रकच्या धडजकेत वृद्ध इसम ठार , “राष्ट्रीय महामार्गावरील टि.पांईट वरील घटना”.

ट्रकच्या धडजकेत वृद्ध इसम ठार , “राष्ट्रीय महामार्गावरील टि.पांईट वरील घटना”.

116

इकबाल शेख – वर्धा 

आद दि.11/10/2021 रोजी 
तळेगांव (शा.पं.) :- शाैचास गेलेला वृद्ध इसम महामार्ग अोलांडतांना गोंधळल्यामुळे अचानक ट्रकच्या समोर आल्याने ट्रकच्या चाकात येवुन काहि अंतरापर्यत फरपट गेल्याने वृद्ध इसम जागीच ठार झाला. सदरची घटना राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी टि. पाईंटवर सकाळी ७.३० वाजताचे दरम्यान घडली.
माणिकराव महाजन वरखडे वय 75 राहणार जुनी वस्ती तळेगांव (शा.पं.) असे मृत वृद्ध इसमाचे नाव आहे.घटनेची नोंद तळेगाव पोलीसांनी घेतली असुन ट्रकसह ट्रक चालक हरीसिंग नेनोसिंग चव्हाण. रा.कलालीया, (राजस्थान) याला अटक केली आहे.

   ट्रक चालक हरीसिंग नेनोसिंग चव्हाण आज सकाळी ७.३० वाजताचे सुमारास ट्रक क्रमांक. GJ- 27- X- 85 61 हा नागपूर हुन अमरावती कडे लोहा घेवुन जात असताना. येथील राष्ट्रिय महामार्गावरील आष्टी टि.पाईंटवर माणिकराव वरखडे शोचावरुन परत जात असतांना रस्ता आेलांडताना गोंधळल्यामुळे ट्रकच्या चाकात आल्याने काहि अंतरापर्यंत फरपटत जावुन त्यांचा जागीच मृत्यु झाला. सदर घटनेची माहिती तळेगाव पोलीसांना मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करुन ट्रकसह ट्रकचालकास ताब्यात घेवुन मृतदेह उत्तरीय तपासनी करीता उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे पाठविण्यात आला.पुढिल तपास ठाणेदार आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजू शाहू, संदिप महाकाळकर, रमेश पर्बत, अमोल इंगोले, हे करीत आहे .

आष्टी टी. पाईंट झाला अपघाताचा हाॅटस्पाॅट

येथील आष्टी टि.पाईंटवर गेल्या काहि वर्षापासुन बरेच अपघात झाले असुन यामध्ये अनेक गुरढोरे व मनुष्यांना प्राणास मुकावे लागले तर अनेकांना अपंगत्व सुद्धा आले. तेव्हा येथे गतिरोधक तयार करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.