Home विदर्भ अखेर यवतमाळ प्रशासनानेच वाजविला बँड…!

अखेर यवतमाळ प्रशासनानेच वाजविला बँड…!

494
यवतमाळ –  प्रतिनिधी 
कोरोणाचे महाभयानक संकट असतानाही रस्त्यावर आपल्या जीवनाची उपजीविका भागविण्यासाठी अनेक व्यवसाय केले जातात विशेष म्हणजे एकेकाळी प्रसाराचं अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून मागासवर्गीय समाजामध्ये वाद्य वाजवण्याची (दवंडी) प्रक्रिया सुरू झाली ही प्रक्रिया सुरू असतानाच अचानक पणे जागतिक महामारी मध्ये शासनाने परिपत्रक काढून काढून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंद घातली असे असताना यामध्ये यवतमाळ शहरातील वाद्य वाजवून आपली उपजीविका आणि मुलांचे शिक्षण करणाऱ्या जवळपास एक हजार कुटुंबीयांना शासनाच्या चुकीच्या आदेशामुळे रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. एकीकडे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्र पासून तर मराठवाड्यात पर्यंत निघालेल्या राजकीय निवडणुकात डीजे आणि इलेक्ट्रॉनिक वाध्याचे साधन यांचा भरपूर वापर केला गेला. समाज माध्यमांवर त्यांचे व्हिडिओ सुद्धा वायरल झाले आहेत. असे असताना यवतमाळ शहरांमध्ये वाद्य वाजवून व नवरात्राच्या महोत्सवामध्ये संगीताच्या माध्यमातून मनोरंजन करून आपली उपजीविका करणाऱ्या कुटुंबीयांच्या विरोधात शासनाने परिपत्रक काढून वाद्य वाजविण्याचा प्रक्रियेवर बंदी घातल्याने अनेकांना जीवनमरणाचा प्रश्न आता उभा ठाकला आहे. यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी वाद्यकांना भेटून त्यांची व्यथा जाणून घेतली विशेष म्हणजे ही सर्व व्यथा कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या समक्ष व्यथा मांडण्यात येणार असून शहरातील व जिल्ह्यातील सर्व असणाऱ्या सर्व वाद्य वाजवून उपजीविका करणाऱ्या नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की त्यांनी या बाबत सतर्क असणे गरजेचे आहे. येत्या काही काळामध्ये जर शासनाने हा आदेश परत घेतला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मनोज गेडाम, घनश्याम हटकर, लोकेश कळणे, दत्तू तेलंग,स्वप्नील नटकर ,सुरेश कळणे यांनी दिला आहे.