Home महत्वाची बातमी प्रशासन खंडाळ्याच्या त्या आजीबाईच्या मागणीकडे लक्ष देईल का?

प्रशासन खंडाळ्याच्या त्या आजीबाईच्या मागणीकडे लक्ष देईल का?

173

 

पांदण रस्ता दुरुस्त करून देण्याची शेतकरी वृद्ध महिला आजीची मागणी

वाशिम तहसीलदार यांनी स्वतःहून लक्ष देण्याची गरज

फुलचंद भगत
वाशिम:- तालुक्यातील खंडाळा खुर्द शेतशिवरतील खंडाळा धरण ते लक्ष्मण जयाजी वानखेडे यांच्या शेतापर्येंत पांदण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
दुरावस्था झालेल्या या पांदण रस्त्यावरुन चालणे कसरतीचे झाले आहे. अशात एक म्हातारी अाजीबाई आपली व्यथा शासना पुढे सांगते की, अहो साहेब पांदण रस्ता दुरुस्त करा हो, मी या रस्त्यावरुन दोनदा पडली, हात पाय चरटले, माझ्या डोळ्याला लागले, आम्हाला दररोज (वावरात) शेतात यावे लागते हो, साहेब… फक्त रस्ता दुरूस्त करा? काही मागत नाही तुम्हाला मी हात जोडून विनंती आहे, दम आला हो मला… मी जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत तरी पांदण रस्ता दुरुस्त करा, मी तुम्हाला काही मागत नाही, फक्त हा पांदण रस्ता दुरुस्त करा, अशी मागणी वृद्ध शेतकरी महिलेने नाव देवकाबाई भगवान भालेराव या अाजीने जिल्हा प्रशासन व शासनाकडे हात जोडून केली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206