Home मराठवाडा गारपीट नुकसानीच्या शासन निर्णयाची स्वाभिमानीकडुन होळी

गारपीट नुकसानीच्या शासन निर्णयाची स्वाभिमानीकडुन होळी

339

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

मागील मार्च,एप्रिल व मे महिन्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीची भरपाईचा राज्य शासनाचा शासन निर्णय ६ ऑक्टोबर रोजी काढला.गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ६ महिने लागले.शासनाच्या या दफतर दिरंगाईचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे गुरुवारी या शासन निर्णयाची होळी करन्यात आली.

गेल्या उन्हाळ्यात गारपिटीमुळे बाधित पिकासाठी १२२ कोटी २६ लक्ष रुपये दिल्याचा शासन निर्णय काढला.तब्बल ६ महिन्यापूर्वी जी गारपीट झाली होती तिचा मदतीचा आदेश आता निघाला.तर मग आता झालेल्या अतिवृष्टीचा निर्णय किती महिन्यानंतर निघेल ? शेतकरी ओरडून कोरडे पडत आहेत.

तरी आत्ताच्या अतिवृष्टीचा निर्णय आताच का घेतला नाही,असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी यावेळी उपस्थित केला.राज्य शासनाच्या लालफिती तील दफतर दिरंगाईमुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे.शासनाच्या या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, तालुका अध्यक्ष राजेंद्र खटके,विद्यार्थी परिषदेचे जिल्हा प्रमुख गणेश गावडे,बप्पासाहेब काळे,सचिन गावडे, सुनील काळे आदींची उपस्थिती होती.