
हाजी दादू सेठ यांच्या नियुक्ती मुळे मुस्लीम समाजात उत्साहाचे वातावरण..
देऊळगाव राजा/(आदील पठाण):- महाराष्ट्र काँग्रेस च्या वतीने नवनिर्वाचित महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली यामध्ये चिखली येथील काँग्रेस चे नेते तथा चिखली मा.नगर उपाध्यक्ष ज़ाहेद अली खान उर्फ हाजी दादू सेठ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र भर हाजी दादू सेठ हे मागील २५ वर्षांंपासुन सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करत आहेत.बुलडाणा जिल्ह्यातील एक दमदार अल्पसंख्याक मुस्लीम नेता म्हणून दादू सेठ ओळखले जातात,२००१-२००२ मध्ये यांनी उपाध्यक्ष नगर परिषद पद भूषविले असून ते युवक काँग्रेस शहर अध्यक्ष,शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ही राहिलेले आहेत.याव्यतिरिक्त विविध सामाजिक विषयांवर शोषीत – पिडित लोकांना न्याय देण्याचे काम आजपर्यत दादू सेठ करत आले आहेत,काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून तसेच पक्षाचे नेते मा.मुकुल वासनिक यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून दादू सेठ यांची ओळख आहे.अनेकांना शासकीय स्थरावर अडलेल्या कामात जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत व शासकिय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असतो.त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक,राजकीय कार्याची दखल घेवुन पक्ष श्रेष्ठी व मुकुल वासनिक यांनी महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीच्या सचिव पदी हाजी दादू सेठ यांची नियुक्ती केली आहे. दादू सेठ यांच्या निवडी नंतर मुस्लिम समाजाला न्याय दिला असल्याची भावना समाजामध्ये दिसत आहे व सदर निवडी नंतर मुस्लीम समाजात मोठ्या उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे,सगळीकडून अभिनंदनाचा,शुभेच्छा चा वर्षाव सुरू असून यावेळी अनेक नेत्यांनी,समर्थक, कार्यकर्त्यानी दादू सेठ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कॉग्रेस पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन तसेच सोपवलेली जबाबदारी मी पुर्ण ताकतीने व मनापासुन करेन राज्यात पक्ष वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करेन अशी ग्वाही हाजी दादू सेठ यांनी दिली.
त्यांनी कॉग्रेस पक्षाचे कामकाज मागील अनेक वर्षांपासून जवळुन पाहिले आहे त्यामुळे त्यांच्या निवडीने पक्षाला नक्कीच याचा फायदा मिळणार आहे.











































