Home महत्वाची बातमी ट्रक व एस टी बस चा भीषण अपघात 12 प्रवाशी जखमी ,

ट्रक व एस टी बस चा भीषण अपघात 12 प्रवाशी जखमी ,

834

 

दोन्ही वाहने धु धु जळाली ,

अमीन शाह ,

अकोला ते बाळापुर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्या जवळ एसटी महामंडळाची बस व ट्रकमध्ये अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यावेळी ट्रक व बसने जागेवरच पेट घेतल्याने बसमधील प्रवाश्यांची मोठी धावपळ झाली. तर यामध्ये 12 प्रवाशी गंभीर जखमी झाले असून अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्या जवळ एसटी बस आणि ट्रकमध्ये अपघात घडला. यावेळी बस व ट्रक अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. यावेळी बसमधील प्रवाशांनी बस मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये 12 प्रवासी गंभीर झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.
यादरम्यान बसने जागेवरच पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता दोन्ही वाहने जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत दोन्ही वाहने जळून खाक झाली होती….

असा झालं अपघात ,

अकोला जिल्हातील बाळापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेळद फाट्याजवळ दुपारी एक वाजता बुलढाणा ते नागपूर जाणाऱ्या एस.टी बस ( क्रं . MH 40 AQ 61 60 ) ची व अकोलावरुन बाळापुरकडे जाणाऱ्या कोळशाचा ट्रक ( क्रं UP 7O GT O515 ) शी समोरा समोर जोरदार धडक झाली . या धडकेनंतर अचानक एसटीने आणि कोळशाने भरलेल्या ट्रकने पेट घेतला . यात ट्रक व एसटी बस जळून खाक झाले . बातमी लीहोसतर जखमी ची नावे मिळू शकली नाहीत ,