Home विदर्भ बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी बाळा जगताप यांचा बँक ऑफ इंडिया आर्वी ला अल्टिमेटम

बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी बाळा जगताप यांचा बँक ऑफ इंडिया आर्वी ला अल्टिमेटम

128

( आर्थिक फसवणूक झालेल्या ग्राहकांना भरपाई द्या अन्यथा आंदोलन )

इकबाल शेख – वर्धा

आर्वी :- गेल्या काही दिवसांआधी बाळा जगताप यांनी आर्वी येथील बँक ऑफ इंडिया मधील कार्यरत बँक मित्र व साथीदार यांनी केलेली गरीब सामान्य खातेदारांची आर्थिक फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले होते. सदर दोषींवर कारवाई प्रस्तावित आहे. मात्र ज्या गोर गरीब शेतकरी, शेतमजूर यांच्या खात्यामधून हा करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाला. त्यांना मात्र योग्य प्रकारे न्याय अजूनपर्यंत मिळालेला नाही. त्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही आहे. त्या अनुषंगाने आज प्रहार चे आर्वी विधानसभेचे नेते बाळा जगताप व कार्यकर्त्यांनी बँक ऑफ इंडिया आर्वी च्या शाखेत जाऊन ठिय्या देत घोषणाबाजी केली. ज्या खातेदारांची फसवणूक झाली त्यांना भरपाई मिळावी अशी मागणी लावून धरली. बँक मध्ये गैरव्यवहारात ज्या कर्मचाऱ्यांनी त्या बँक मित्राला मदत केली. जे कर्मचारी त्या बँक मित्रासोबत ओल्या पार्ट्या झोडत होते. त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्या कर्मचाऱ्यांवर बँकेने कार्यवाही करावी. ज्या बँक मध्ये अशाप्रकारचा करोडो रुपयाचा अपहार होतो ती बँक व तेथील अधिकारी कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने आज बाळा जगताप यांच्या नेतृत्वात प्रहार ने आंदोलन केले. बँक ऑफ इंडिया च्या झोनल ऑफिसर वर्धा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र जर ११ ऑक्टोबर पर्यंत काही ठोस निर्णय बँक प्रशासनाने घेतला नाही तर प्रहार सर्व आर्थिक फसगत झालेल्या खातेधारकांसोबत बँक समोर “मुंडण आंदोलन” करून उपोषणाला सुरवात करेल असा इशारा बाळा जगताप यांनी बँक प्रशासनाला देत. आर्थिक फसवणूक झालेल्या सर्व खातेदारांनी आपल्या हक्काच्या लढाईसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन बाळा जगताप यांनी केले.
यावेळी बाळा जगताप यांच्यासह सुधीर जाचक, अरसलान खान, विक्रम भगत यांच्यासह शेकडो खातेधारक व कार्यकर्ते उपस्थित होते