Home विदर्भ चार एकर शेतातील कापूस पीक करपले शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.

चार एकर शेतातील कापूस पीक करपले शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.

593

शेतकऱ्यासह बहुजन मुक्ती पार्टी ची मागणी.

  यवतमाळ / दारव्हा –  गौळपेंड येथील शेतकरी डोमा कमल्या राठोड यांच्या कडे  १.८८हे.आर.(गट क्र.१४९) पेकर्डा शेतशिवरात शेतजमीन असून त्या शेतामध्ये यावर्षी कापूस पीक लावले आहे.परंतु सततच्या पावसामुळे संपूर्ण चार एकर शेतातील कापूस पीक करपले आहे.त्यांच्या कडे शेतीच्या उत्पन्नाशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही.दरवर्षी त्यांना  २५ – ३०की. कापूस पीक होत होते.परंतु अतिवृष्टीमुळे संपुर्ण पीक करपले आता पुढील व्यवहार करायचा कसा हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.त्यामुळे सदर पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई प्रशासनाने देण्यात यावी.अशी मागणी मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा.तहसीलदार साहेब दारव्हा, मा.कृषी अधिकारी साहेब दारव्हा यांना शेतकरी डोमा कमल्या राठोड,नंदू डोमा राठोड (मुलगा)यांच्यासह बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.