Home बुलडाणा चिखली येथे रिपब्लिकन सेनेची बैठक कार्यकर्ता चर्चास्त्रा चे आयोजन ,  

चिखली येथे रिपब्लिकन सेनेची बैठक कार्यकर्ता चर्चास्त्रा चे आयोजन ,  

549

 

 

उपस्थित राहण्याचे भाई विजयकांत गवई यांचे आवाहन
 

प्रा , तनजीम हुसेन ,

चिखली प्रतिनिधी ,

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या विचारधारेवर चालणारा रिपब्लिकन सेना हा पक्ष उपेक्षितांना न्याय, देणारा असुन वेळोवेळी लोकशाही मार्गाने आवश्यक असलेल्या प्रत्येक ठिकाणी आंदोलने, मोर्चे काढलेले आहेत.
याच अनुषंगाने रिपब्लिकन सेनेच्या संस्थापक अध्यक्ष मा.आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, लोकनेते मा.विजयजदादा वाकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  दि. 1 ऑक्टोबर ला चिखली येथील विश्रामगृहामध्ये कार्यकर्ता बैठकी संदर्भात आगमन होणार असून या मेळाव्याला जिल्ह्य़ातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेते, भाई विजयकांत गवई यांनी केले आहे.
यावेळी या बैठकीमध्ये तमाम बहुजनवादी, व समस्त जनतेस, कार्यकर्त्यांस, आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुकी संदर्भात मा. विजयदादा वाकोडे व विदर्भ अध्यक्ष योग्रेंद्र चवरे यांच्या नेतृत्वात चिखली येथील विश्रामगृहामध्ये बैठक आयोजित केली आहे. यावेळी जिल्ह्य़ातील युवा आघाडीची निवड देखील करण्यात येणार आहे तरी समस्त रिपब्लिकन सेनेच्या विचारधारेवर चालणार्‍या समस्त बहुजनवादी जनतेने उपस्थित राहावे व मा. आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करावे. असे आवाहन भाई विजयकांत गवई, शेख सलीम भाई, सुरेश इंगळे, ब्रम्हा साळवे, सुनील सोळंके, सत्य कुटे, सतीष पवार. आदींनी केले आहे.