Home मराठवाडा आरोग्य विभागाच्या जागा भरती मध्ये झालेल्या “सेटिंग”ची उच्चस्तरीय चौकशी करा – भाजपा...

आरोग्य विभागाच्या जागा भरती मध्ये झालेल्या “सेटिंग”ची उच्चस्तरीय चौकशी करा – भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची मागणी

480

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

आरोग्य विभागाच्या जागा भरती मध्ये “सेटिंग” झाल्याची माहिती अनेक वृत्तपत्रांनी दिलेली आहेत. सेटिंग दरम्यान ०५ लाखापासून २५ लाखापर्यंत ची रक्कम परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली आहे अशी देखील माहिती सदरील वृत्तपत्रांमध्ये आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रधान सचिव आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र मुंबई यांना दिलेल्या पत्रात राहुल लोणीकर यांनी ही मागणी केली आहे.

अनेक दिवसांपासून रखडलेली आरोग्य विभागाची ६२०० जागांची क व ड गटातील नोकर भरती परीक्षा होणार होती ती परीक्षा आज मध्यरात्री अचानक पणे आरोग्यमंत्री व आरोग्य विभागाने रद्द केली यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे परीक्षा न झाल्यामुळे किंवा परीक्षा होऊन नोकरी न मिळाल्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे ताजी आहेत असे असताना पुन्हा एकदा आरोग्य विभागाने अशा प्रकारे परीक्षेदरम्यान गोंधळ घालणे म्हणजे या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आत्महत्येच्या दिशेने पुढे ढकलणे असे होत नाही काय? असा सवाल देखील राहुल लोणीकर यांनी पत्रात उपस्थित केला आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या शिवाय याबाबत आरोग्यमंत्री व सरकार योग्य, सकारात्मक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताचे निर्णय घेणारच नाही का? असा सवाल देखील आता सर्वसामान्य परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पडला आहे असेही राहुल लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.

१. आरोग्य विभागाच्या जागा भरती मध्ये “सेटिंग” झाल्याची माहिती अनेक वृत्तपत्रांनी दिलेली आहेत. सेटिंग दरम्यान ०५ लाखापासून २५ लाखापर्यंत ची रक्कम परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली आहे अशी देखील माहिती सदरील वृत्तपत्रांमध्ये आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

२. दोन दिवसात पुढची परीक्षा जाहीर न झाल्यास परीक्षार्थींची परीक्षा फीस व परीक्षा सेंटर पर्यंत जाण्याचा झालेला खर्च शासनाने विद्यार्थ्यांना तात्काळ परत करावा.

३. परीक्षार्थीचे मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने समुपदेशन करावे.

४. दोन दिवसात परीक्षेची पुढची तारीख जाहीर करावी.

या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा अधिक आक्रमकपणे आंदोलन करील व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. असा इशारा देखील पत्राद्वारे राहुल लोणीकर यांनी पत्राद्वारे दिला आहे.

*आरोग्य विभागाच्या जागा भरती मध्ये झालेल्या “सेटिंग”ची उच्चस्तरीय चौकशी करा – भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची मागणी*