Home मराठवाडा जालना जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एस , टी , बस गेली वाहून ,

जालना जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एस , टी , बस गेली वाहून ,

622

 

 

सर्व प्रवासी सुखरूप ,

पोलीसवाला न्युज नेटवर्क ,

परतूर आष्टी बस श्रीष्टी गावाजवळ पुलावरून नदीत कोसळली;22 प्रवाशी बालंबाल बचावले
पोलीस आणि ग्रामस्थांचे मदतकार्य

परतूर आगाराची आष्टीकडे आज रात्री 8 वाजेच्या राज्य परिवहन मंडळाची बस जात होती._
या रस्त्याचे काम सुरू असून श्रीष्टी गावाजवळ वाहणाऱ्या कसुरा नदीवर असलेल्या लहान पुलाचा चालकाला अंदाज आला नाही._
_ही बस पुलावरून नदीत कोसळून पाण्यात उलटली._
_याठिकाणी चारफुटावर पाणी होते, ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करून प्रवाश्यांना बसमधून बाहेर काढले._
_ परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन मदत कार्य केले”_