Home मराठवाडा आमदार लक्ष्मण पवार यांच्या प्रयत्नातून गोदावरी नदीवर लवकरच पूल -शिवराज पवार

आमदार लक्ष्मण पवार यांच्या प्रयत्नातून गोदावरी नदीवर लवकरच पूल -शिवराज पवार

209

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

गोदावरी नदीवर होणाऱ्या पुलासाठी बोर टेस्टिंग गोपतपिंपळगाव येथे संपन्न

मराठवाडा विदर्भाला जोडणारा विरेगाव घाटसावळी हा पर्यायी रस्ता विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी नांदी ठरणार असून जालना व बीड जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राचे शॉर्टकट मार्गाने अंतर कमी होणार आहे. तसेच विरेगाव – उक्कडगाव – २३३ घाटसावळी महामार्गाला जोडणारा पर्यायी रस्ता आता लवकरच दृष्टीक्षेपात असल्याचे प्रतिपादन कल्याण तौर यांनी केले. विरेगाव-घाटसावळी या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्यावरील उक्कडगाव-गोपत पिंपळगाव येथील गोदावरी नदीवरील ३५ कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या उद्घाटन कामाची बोअर टेस्टींग करण्यात आली.

गेवराई तालुक्यातील गोपत पिंपळगाव येथे दि 17/9/2021 शुक्रवार रोजी दु 12 वा गोपतपिपळगाव उक्कडगाव गोदावरी नदीवरील पुल बांधकाम बोर टेस्टीग भुमीपुजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू शामराव पवार, युवक नेते शिवराज पवार , युवा नेते शैलराजे तौर, मा सभापती रघुनाथ तौर , भाजपा तालुका अध्यक्ष संजय तौर, नगरसेवक यहीय्या खान, मा सभापती सतीश पवार, इतिहास तज्ञ सतीश साळुंके, अॅड. विनोद तौर. शय्याजी पवार, युवा नेते गोपाल चव्हाण, सुदाम आर्दड, अशोक तौर ,किरण शिंदे, गोविंद तौर, सरपंच अशोक तौर, भगवान तौर , गणेश तौर, सूर्यकांत तौर, अनिल तौर, उद्धव तौर,आदीसह नागरिकांची उपस्थिती होती ,पुढे बोलताना कल्याण तौर म्हणाले की, गोदावरी भागातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न अगदी मार्गी लागणार असून गेल्या तीस वर्षाच्या मागणीला आता कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे , त्यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे, गोपत पिंपळगाव उक्कडगाव गोदावरी नदीवर, पुल बांधकामाचे काम होत आहे .या भागातील विकासाला चालना देण्याचे काम आमदार पवार यांच्या माध्यमातून झाले आहे. यावेळी गेवराई चे लाडके युवा नेते शिवराज पवार म्हणाले के, गेवराई तालुक्याचे दळणवळणाचे साधन, रस्त्यावर अवलंबून असल्यामुळे योग्य रस्ता करण्याची गरज असते ते काम आमदार लक्ष्मण पवार यांनी खेडे पाडे तांडा वस्ती गावापर्यंत डांबरी रस्ता पोहोच करून दळणवळण साधन बनले आहे गेवराई तालुक्यात रस्त्याचे जाळे निर्माण केल्यामुळे व सर्वांगीण विकास हाच मूलमंत्र ठेवून काम केल्यामुळे गेवराई तालुक्याच नाव आ.पवार यांच्या विकासाबद्दल घेतले जाते येणाऱ्या काळामध्ये गेवराई तालुक्याचा सर्वांगीण विकास रस्ते पाणी वीज या मूलभूत गरजा जनतेसाठी पूर्ण करण्यासाठी पवार कुटुंब नेहमी जनहितासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शिवराज पवार यांनी व्यक्त केले. यावेळी संजय तौर, शिव्यव्याख्याते भगवान तौर , सरपंच सुदाम अर्दड यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन आभार गोपाल भैय्या चव्हाण यांनी केले यावेळी उद्धव तौर ,भगवान तौर, किरण शिंदे, विजय सुरनर, संतोष मस्के, विलास मस्के, योगेश तौर,इम्रान शेख, सोमनाथ तौर, मोतीलाल बळी, सुदाम तौर, विनोद तौर, मच्छिंद्र तौर, प्रभाकर तौर, रमेश तौर, उत्तरेश्वर महाराज , लक्ष्मण मस्के,
डिगांबर तौर, निलेश तौर ,ऊत्रेश्वर तौर, ऊत्तम तौर, ऊध्दव तौर, निव्रती तौर, आशोक तौर सर, नामदेव तौर, प्रतिक तौर, नितीन तौर, नारायन तौर ,देविदास तौर, रामभाऊ तौर ,पवन तौर, गणेश तौर, गणेश माने, रामदास माने, दत्ता माने, बालासाहेब तौर ,वसंत तौर, रंगनाथ तौर, महादेव बळी, दगडु बळी ,मुकुंद तौर, शहादेव माने आदिंची उपस्थिती होती.