
प्रशांत नाईक
अमरावती – धामणगांव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे पोलीस स्टेशनं मंगरूळ दस्त व गणेश मंडळ,अभ्यासिका विद्यार्थी,पोलीस पाटील संघटना व NSS च्या संयुक्त विद्यामाने आज दि.16/09/2021रोजी भव्य दिव्य अश्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9:30ते 4:30पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शासकीय रुग्णालय अमरावती यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबीर पार पडले.रक्तदान शिबिराला परिसरातील तरुण युवक,पोलीस पाटील, सरपंच, गणेश मंडळ,इत्यादी पदाधिकारी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजापुढे आदर्श निर्माण केला.रक्तदान शिबिरात एकूण 105रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शन मा. सुरज तेलगोटे ठाणेदार पोलीस स्टेशनं मंगरूळ दस्त यांचे लाभले.











































