Home विदर्भ महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हद्यपार आदेश पारीत व तामील.

महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हद्यपार आदेश पारीत व तामील.

484

रविन्द्र साखरे

वर्धा पो.स्टे. रामनगर येथील सराईत गुन्हेगार 1) प्रसाद उर्फ यष निलेष पराते वय 21 वर्ष रा. न्यु रेल्वे कॉलनी, रामनगर, वर्धा 2) अंकुष गजानन तिरपुडे वय 21 वर्ष रा. हिंद नगर, वर्धा 3) अंकित उर्फ अनिकेत नरेष वाटकर, वय 22 वर्ष रा. सिंदी मेघे, वर्धा हे पोलीस स्टेशन रामनगर परीसरात गुंडगीरी करून दहषत पसरवीत असून अवैध दारूची विक्री व वाहतूक करण्याचे सवयीचे आहेत. लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जिवाने मारणे व मारण्याचा प्रयत्न करणे, हातामध्ये तलवारी चाकू सारखे हत्यारे घेवून साक्षदारांना धमकावणे हा त्यांचा नित्याचा नियम झालेला आहे. असे निदर्षनास आल्याने श्री. धनाजी जळक, पोलीस निरीक्षक पो.स्टे. रामनगर यांनी उपरोक्त इसमांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये हद्यपार प्रस्ताव पोलीस अधिक्षक, वर्धा यांना सादर केला होता.
यापुढे होणाÚया सण उत्सवदरम्यान शांतता व सुव्यवस्था राहावी याकरीता मा. पोलीस अधिक्षक, वर्धा यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक कक्ष-23/हद्यपार/2021 -3108, दिनांक ०८-०९-२०२१ अन्वये आदेश पारीत करण्यात आला आहे. सदर आदेशानूसार उपरोक्त आरोपीतांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये वर्धा जिल्हयातून 6 महिण्याकरीता हद्यपार करण्यात आले आहे.
वर्धा जिल्हयातील गुंड प्रवृत्ती व अवैध दारू विक्रेत्यांच्या अवैध व्यवसायावर आळा बसविण्याकरीता वर्धा पोलीसांकडून कठोर कार्यवाही करण्यास सुरवात केली असून यापूढे सुध्दा अश्याच प्रकारे कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदर कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधिक्षक यशवंत सोलंके, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. धनाजी जळक, पो.स्टे. रामनगर, पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड, स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.