Home मराठवाडा विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात करणाऱ्या पती व सासर्यास अटक

विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात करणाऱ्या पती व सासर्यास अटक

467

खळबळजनक घटना…

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २४ :- विवाहीतेचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात पोलिसांनी विवाहीतेचा पती किशोर भुजबळ व सासरा सोपान भुजबळ या दोघांना बुधवारी अटक केली. त्या दोघांना शुक्रवारपर्यंत (दि. २४) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम.ए. मोटे यांनी दिले. प्रकरणा यापूर्वी आरोपी डॉ. अंबादास मोरे याच्यासह पती व सासNयाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
प्रकरणात संबंधित विवाहितेने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, तिचा विवाह किशोर सोपान भुजबळ (रा. रांजणगाव, ता. पैठण) याच्याशी ३० डिसेंबर २०१८ रोजी झाला होता. गर्भधारणेनंतर आरोपी डॉ. राहूल इंदे विवाहीतेचा सासरा सोपान विठ्ठल भुजबळ, बोगस डॉक्टर संदीप अंबादास मोरे (४०, रा. शेणपुंजी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) व अमरप्रित चौकातील सरोज हॉस्पिटल येथील डॉ. राठी यांनी विवाहीतेचा तिच्या नकळत गर्भपात केला. मात्र विवाहीतेला त्रास सुरू झाल्यानंतर ती सरोज हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिने उपचारांची कागदपत्रे मागितली. मात्र कागदपत्रे देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर तिने दुसर्या डॉक्टरांकडे उपचार घेतले असता तिचा गर्भपात करण्यात आल्याचे समोर आले.
विवाहीतेने प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी तीच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे विवाहीतेने न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला. न्यायालयाने तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांना आरोपी किशोर सोपान भुजबळ (पती), लिला सोपान भुजबळ (सासू), सोपान विठ्ठल भुजबळ (सासरा), डॉ. संदीप अंबादास मोरे व डॉ. राठी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.