Home विदर्भ झटाळा येथे प्रधानमंत्री आवास योजना घरकुलाचा दुसरा हप्ता मंजुर करण्यासाठी नउ हजार...

झटाळा येथे प्रधानमंत्री आवास योजना घरकुलाचा दुसरा हप्ता मंजुर करण्यासाठी नउ हजार रुपयाच्या लाचेची मागणी..!

440

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील झटाळा येथील ग्रामपंचायत अंतर्गत शासनाकडून मंजुर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजना घरकुलचा दुसरा हप्ता मंजुर करण्यासाठी नउ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार, घरकुल लाभार्थी शंकर जयप्रकाश मोहीते यांनी तहसीलदार पुजा माटोडे सह पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण आदींकडे केली आहे. यामुळे घाटंजी तालुक्यात खळबळ माजली आहे.
पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

झटाळा येथील घरकुल लाभार्थी शंकर जयप्रकाश मोहीते यांचे प्रधानमंत्री आवास योजनेतून शासनाकडून घरकुल मंजुर झाले होते. तसेच घरकुलाचा पहीला हप्ता पंधरा हजार रुपयाचा लाभार्थांच्या खात्यात या पुर्वीच झालेला आहे. त्यामुळे लाभार्थाने नियमानुसार घरकुलाच्या जोत्याचे बांधकाम करण्यात आले. असे असतांना उर्वरित घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी घरकुल लाभार्थांला पंचेचाळीस हजार रुपयाचा दुसरा हप्ता मंजुर करण्यासाठी सचिव, सरपंच यांची भेट घेऊन दुसऱ्या हप्य्त्याच्या फाँर्मवर सही घेण्यास लाभार्थी सचिवाकडे गेला असता, ग्रामपंचायत सचिवाने सरपंच, उपसरपंच व मला प्रत्येकी तीन – तीन हजार असे एकुन नउ हजार रुपये द्यावे लागेल तरच घरकुलाचा दुसरा हप्ता मंजुर करण्यात येईल, असे लाभार्थांना सांगितले. त्यामुळे शासनाने मंजुर केलेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप घरकुल लाभार्थी शंकर मोहीते (झटाळा) यांनी लेखी तक्रारीतुन केला आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थी मोहीते यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार तहसीलदार पुजा माटोडे, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आदींकडे दाखल करण्यात आली आहे. तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार घाटंजी,पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर आदीं ठिकाणी दाखल करण्यात आली आहे. पुढील चौकशी पारवा पोलीस करीत आहे.
⚫ झटाळा ग्रामपंचायतचे सचिव नारायण नांदणे यांची भ्रमणध्वनीवर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी भ्रमणध्वनी रिसिव्ह केलेला नसुन कोणताही प्रतिसाद दिला नाही.
⚫ झटाळा येथील उपसरपंच रवि मसराम यांची प्रतिक्रिया घेतली असता, प्रधानमंत्री आवास योजनेतून शंकर मोहीते यांचे शासनाकडून घरकुल मंजूर झाले आहे. लाभार्थांकडे घर टँक्स पावती आहे. मात्र, त्याचे नावाने जागेच्या मालकीचा नमुना आठ अ असेसमेंट नक्कल ग्रामपंचायत रेकार्डला उपलब्ध नाही. सदरचे बांधकाम हे नियमबाह्य असुन अतिक्रमण केलेल्या जागेवर आहे, असे त्यांनी सांगितले.
⚫ घरकुल लाभार्थी शंकर जयप्रकाश मोहीते यांची प्रतिक्रिया घेतली असता, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना व ईतर घरकुल योजनेचे हप्ते मंजुर करण्याचे अधिकार सरपंच, सचिव व ग्राम रोजगार सेवक यांना आहे. या तिघांचे सह्या व शिक्के घरकुलाचा हप्ता मंजुर करण्यासाठी फाँर्म वर घ्यावे लागते. त्या नंतरच पंचायत समिती कार्यालयात सदरचा फाँर्म दाखल करण्यात येते. तसेच घरकुलाच्या बाबतीत झटाळा येथील उपसरपंचाना प्रतिक्रिया देण्याचा अजिबात अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.