Home मराठवाडा मुसळधार पावसामुळे शेतशिवारं गेली वाहून, सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

मुसळधार पावसामुळे शेतशिवारं गेली वाहून, सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

360

जालना जिल्ह्याच्या अंबड- घनसावंगी तालुक्यात शनिवारी रात्री पडलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आल्याने शेतशिवारं वाहून गेली आहेत.खरिपाची पीकं ठोक्या पावसाने खलास झाली आहेत,शेतशिवारच खंगाळून गेल्याने पंचनामे कशाचे करणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

अंबड-घनसावंगी तालुक्यातील पंचक्रोशीत शनिवारी रात्री तुफान पाऊस झाला. सिद्धेश्वर पिंपळगाव,मांदळा,बोडखा,
तीर्थपुरी सर्कल, कुंभार पिंपळगाव सर्कल, मच्छिंद्रनाथ चिंचोली सर्कल,तसेच घुंगर्डे हदगाव,जांबसमर्थ, पिंपरखेड,खड्का,लिंबोणी,
मासेगाव, जिरडगाव ,काकडे कंडारी,अंबड तालुक्यातील वडिगोद्रीसह अंतरवाली सराटी,दुनगाव,सौदलगाव,धाकलगाव, टाका,दोदडगाव,रामगव्हाण,नालेवाडी,पाथरवाला,आदी शेतशिवारात अतिवृष्टीमुळे बहरात असलेल्या सोयाबीन,तूर, कपाशी पिवळी पडू लागली आहेत.नदी नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने शेतशिवार वाहून गेले आहे.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.महसुल प्रशासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.