Home जळगाव एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा किटचे वाटप

एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा किटचे वाटप

221

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उपक्रम

रावेर (शेख शरीफ)
रावेर तालुका आणि रावेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त गरिबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर किसानसभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाजन, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, डॉ. शब्बीर शेख, शहराध्यक्ष महेमुद शेख, यांच्या हस्ते गरिबी महिलांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, इम्रान खान,पंकज वाघ,सलिमभाई, योगेश महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.