
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
बदली न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा वाट्स अॅप ग्रुप वर टाकून गायब झालेला पोलिस हवालदार गोविंद कुलकर्णी हा गायब झाल्याने जालना जिल्हा पोलीस प्रशासनात धांदल उडाली होती.शोधाशोध केल्यानंतर रात्री उशिरा त्यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन पतंगे यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या होत्या.घनसावंगी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार गोविंद कुलकर्णी यांनी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन बदली संदर्भात विनंती अर्ज केला होता.परंतु बदली झालेल्या पोलिस यादीत त्यांचे नाव दिसले नाही.आपण वारंवार विनंती करूनही वरिष्ठांनी दखल न घेतल्याने गोविंद कुलकर्णी अस्वस्थ होते.त्यामुळे पोलिस हवालदार गोविंद कुलकर्णी यांनी गुरुवारी,२ सप्टेंबर रोजी एका व्हाट्स अप ग्रुपमध्ये स्वत्:चा विडिओ बनवून त्यामध्ये माझी संध्याकाळ पर्यंत बदली न झाल्यास मी अज्ञात स्थळी जावून आत्मदहन करीन असा इशारा दिला होता.यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती.दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केल्यावर पोलिसांनी गोविंद कुलकर्णी यांस शोधून कारवाई केली.











































