
दुसरबीड जी , बुलडाणा
दुसरबीड येथील ग्रामपंचायतच्या वतीने मागच्या मंगळवारी भरणारा बाजार करोणा संसर्ग वाढत असल्याच्या कारणाने बंद ठेवण्यात आला होता बाजार सुरू करण्याचे प्रशासनाचे कुठलेच आदेश नाही असे असताना मात्र स्थानिक प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता आज मंगळवार ला दुसरबीड वाशीयांनी जोरदार बाजार भरवला
वास्तविक सध्या कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका जास्त आहे आणि त्यातच बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे अशा परिस्थिती असल्याने यावेळी बाजार बंद ठेवणे अत्यावश्यक होते त्यासाठी स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत ने बाजार बंद ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते मात्र या मंगळवारचा बाजार बंद ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नाही आणि त्यातच दुकानदाराने मागील मंगळवारी दिलेल्या बंद च्या आदेशाला न जुमानता बाजार भरवला त्यामुळे या बाजारात कोरोनाची कसलीच भीती नाही का ? अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांकडून उमटल्या आहे आजच्या बाजारात प्रचंड गर्दी होती सोशल डिस्टंसिंग कुठलेच पालन होत नव्हते आणि मास्क तर कुणाच्याच तोंडाला दिसले नाही कोरोणाच्या नियमाचे सोयर-सुतक कोणत्याच बाजार करू दुकानदाराना दिसले नाही हा बाजार भरला कसा स्थानिक प्रशासनाचे इतके दुर्लक्ष का केवळ एका मंगळवारी बाजार बंद ठेवला आणि दुसऱ्या दिवशी द मंगळवारी तो पुन्हा कसा कुणाच्या आशीर्वादाने सुरू झाला त्यामुळे प्रशासनाचा वचक राहिला नाही का असे एक ना अनेक सवाल हा बाजार भरल्यामुळे व्यक्त होत आहे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन हा बाजार ज्यांनी भरू दिला त्यावर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे जर हा बाजार भरला तर पुढच्या वेळेस तालुक्यातील अनेक बाजार सुरू राहतील त्यामुळे आतापासूनच प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे अन्यथा कोरणा वाढण्यापासून कोणी रोखू शकणार नाही समभावय धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे ,











































