Home मराठवाडा टेंभुर्णी येथील व्यापारी प्रदीप मुळे यांचा संशयास्पद मृत्यू, चौकशी साठी नागरिकांचा पोलिस...

टेंभुर्णी येथील व्यापारी प्रदीप मुळे यांचा संशयास्पद मृत्यू, चौकशी साठी नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

98

टेंभुर्णी चे व्यापारी समाजिक कार्यकर्ते स्व प्रदिप मुळे यांच्या मुत्यूची विशेष पथकाच्या वतीने चौकशी करून न्याय द्यावा गावकऱ्यांनी काढला पोलीस स्टेशन वर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

जालना – लक्ष्मण बिलोरे

टेंभुर्णी येथील व्यापारी व समाजिक कार्यकर्ते भाजपा ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष उपसभापती स्व प्रदिप विलासराव मुळे यानी पैठण येथे एका विहिरीत आत्महत्या केली होती
सदर प्रकरणी प्रदिप मुळे यांनी दिनांक18 आँगस्ट बुधवार रोजी खाजगी वाहना द्रारे अहमदनगर जिल्ह्यातील सुवर्ण ज्योत हाँटेल मध्ये रुम क्रमांक105 मध्ये वाहन चालक शिवा जितकर यांच्या नावाने रुम बुकिंग केली होती परंतु भाड्याने नेलेल्या स्विफ्ट डिझायर च्या चालक शिवा जितकर यांना तु गाडी घेऊन जा मला येथे काम आहे असे सांगितले या दरम्यान प्रदिप मुळे यांचे सुवर्ण ज्योत हाँटेल मध्ये येताना सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये चित्र आहे परंतु 19 आँगस्ट गुरुवारी सकाळी जाताना चित्रिकरण नाही त्यानंतर वाहन चालकाने त्यांच्या घरी निरोप ही दिला नाही यामुळे भाऊ सदिप मुळे यांनी आपला भाऊ घरी आला नाही म्हणून सिल्लोड येथे जाऊन चौकशी केली त्यातंर माहिती मिळाली की शिवा जितकर यांनी भाडे घेऊन गेला होता त्यांच्या कडे चौकशी केली असता त्याने मी प्रदिप मुळे यांना औरंगाबाद येथील हेडगेवार दवाखान्यात सोडले असे खोटी माहिती दिली तेथे चौकशी केली तर तीथे ही माहिती मिळाली नाही पुन्हा मोबाईल काँल करून शिवाला विचारले तर आम्ही अहमदनगर येथील सुवर्ण ज्योत लाँज वर गेलो होतो तेथील व्यवस्थापक यांच्या कडे चौकशी केली असता वरील नावाने बुकींग केलेली आढळून आले परंतु गुरुवारी सकाळी च ते येथून गेले शोधा शोध करीत असताना टेंभुर्णी पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली यावरून औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील रोडच्या कडेला असलेल्या विहिरी त सोमवारी तारीख 23 ला प्रदिप मुळे याचे प्रेत आढळून आले असे पैठण पोलिसांनी टेंभुर्णी पोलिसांना संदेश दिला यावरून टेंभुर्णी पोलिसांनी नातेवाईक घेऊन घटनास्थळी दाखल झाले यावरून मयत प्रदिप मुळे यांचे लहान भाऊ संदिप मळे यांनी ता 26 आँगस्ट रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली माझ्या भाऊची आत्महत्या नसुन घातपात आहे सखोल चौकशी करून न्यायीक मागणी केली सदरील प्रकरणी स्थानिक व्यापारी पत्रकार गावकऱ्यांनी ता 27 आँगस्ट रोजी सकाळी मुक मोर्चा काढून पोलीस ठाण्यात सपोनि रवींद्र ठाकरे यांना मयत प्रदिप मुळे याची आत्महत्या की घातपात झाला याची विशेष पथकाच्या वतीने चौकशी करून मुळे कुंटुबाला न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन सादर केले यावेळी ओबीसी समुहाचे चेअरमन रावसाहेब अंभोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामधन पाटील कळंबे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अलकेश सोमाणी राम गुरव विष्णू जमदाडे पि जी तांबेकर भिकनखाँ पठाण लक्ष्मण शिंदे फैसल चाऊस पाडुरंग बोरसे संजय राऊत विष्णू मगर बालाजी शेवाळे दिपक जमदाडे किशोर कांबळे डॉ अविनाश सुरुशे राजु खोत गजानन मुळे रविंद्र उखर्डे अशोक पाबळे प्रदिप मघाडे सतोष पाचे जितेंद्र म्हस्के शंकरराव मुळे धिरज काबरा कल्पेश सोमाणी सजय बोडखे राजू मगर शिवराज सपाटे रवि खरात शारेक सिदीकी बाळु देशमुख सचिन देशमुख यांच्या सह मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते.